scorecardresearch

Premium

“BCCI एवढे पैसे नसतील पण..”, IND vs SA सामना रद्द होताच गावसकर भडकले; म्हणाले, “पूर्णपणे खोटं..”

IND vs SA First T20I: CSA चे मुख्य कार्यकारी फोलेत्सी मोसेकी यांनी सांगितल्याप्रमाणे पैशांची आकडेवारी जुळवण्यासाठी ‘भारताविरुद्ध मालिका’ ही नक्कीच मदत करू शकते. प्रक्षेपणाच्या अधिकारासाठीच CSA एक अब्ज रँड (53 दशलक्ष डॉलर्स) पेक्षा जास्त कमावण्याची अपेक्षा आहे.

Sunil Gavaskar blasts Cricket South Africa over washed out IND vs SA 1st T20I Might Not Have Money Like BCCI but Lying to Say No Fund
सुनील गावसकर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट व्यवस्थापन बोर्डाला खडेबोल सुनावले (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

IND vs SA Sunil Gavaskar Slams South Africa: रविवारी डरबनमध्ये सततच्या पावसामुळे टीम इंडियाची प्रोटीज विरुद्ध मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट व्यवस्थापन बोर्डाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ऑस्ट्रेलियावर 4-1 असा शानदार विजय नोंदवल्यानंतर, सूर्यकुमार यादवची टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील पहिल्या सामन्यासाठी किंग्समीड स्टेडियमवर दाखल झाली होती. पण पावसाच्या संततधारेमुळे किंग्समीड येथे एकही चेंडू टाकल्याशिवाय पहिला सामना रद्द झाला.

CSA साठी या मालिकेतील प्रत्येक सामना हा महत्त्वाचा असणार आहे कारण, CSA चे मुख्य कार्यकारी असलेले फोलेत्सी मोसेकी यांनी सांगितल्याप्रमाणे पैशांची आकडेवारी जुळवण्यासाठी ‘भारताविरुद्ध मालिका’ ही नक्कीच मदत करू शकते. प्रक्षेपणाच्या अधिकारासाठीच CSA एक अब्ज रँड (53 दशलक्ष डॉलर्स) पेक्षा जास्त कमावण्याची अपेक्षा आहे.

PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”
Domestic violence
भारतात मुलींचे हक्क, अधिकारांबाबत उदासीनता! ‘तिचे’ हिंसाचार, कुपोषण, बलात्काराच्या घटनांमधून कसे होईल संरक्षण?
RPF Recruitment 2024
RPF अंतर्गत लवकरच २००० पदांची मेगाभरती! १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; पाहा कुठे आणि कसा करायचा अर्ज
Mumbai Highcourt
“मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले

पण इतकी मोठी संधी असूनही पहिलाच सामना रद्द झाल्यामुळे भारताचे माजी कर्णधार गावसकर यांनी CSA वर ऑन-एअर शाब्दिक हल्ला केला. नाणेफेकीच्या वेळीच पावसाचे आगमन झाले होते पण तरीही प्रोटिज बोर्डाने मैदान झाकले नाही. जर मैदान उघडं राहिलं आणि पाऊस थांबला, तर तुम्हाला माहिती आहे की तो आणखी एक तास सुरू होणार नाही. पण अचानक पुन्हा पाऊस पडला त्यामुळे खेळ झालाच नाही. प्रत्येकाला (क्रिकेट मंडळांना) भरपूर पैसे मिळत आहेत. कोणतीही चूक करू नका. सर्व क्रिकेट बोर्डांकडे भरपूर पैसा आहे. जर ते काही वेगळं सांगत असतील तर ते खोटं बोलत आहेत. त्यांच्याकडे बीसीसीआयइतके पैसे नसतील पण प्रत्येक बोर्डाकडे कव्हर खरेदी करण्यासाठीचे पैसे नक्कीच आहेत, असं गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितलं.

प्रोटिजमधील स्थितीवर टीका करताना गावसकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष सौरव गांगुलीचाही विशेष उल्लेख केला. गावसकर पुढे म्हणाले की, “कोलकात्याचे ईडन गार्डन हे भारतातील एकमेव स्टेडियम आहे ज्यात पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज प्रणाली आहे. मंडळांना संपूर्ण मैदान कव्हर करता आले पाहिजे, कोणतीही सबब देऊन चालणार नाही. मला आठवतं की मला इडन गार्डन्सवरील टेस्ट मॅचला बोलावलं होतं तिथे काही अडचण आली होती आणि खेळ सुरू झाला नाही. पुढच्या सामन्यात, ईडन गार्डन्सवर संपूर्ण मैदान झाकलं होतं. तुम्हाला असाच निर्णय हवा होता. सौरव गांगुली हा प्रमुख होता आणि ईडन गार्डन्सकडे कोणीही बोट दाखवू शकणार नाही याची त्याने काळजी घेतली.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sunil gavaskar blasts cricket south africa over washed out ind vs sa 1st t20i might not have money like bcci but lying to say no fund svs

First published on: 11-12-2023 at 08:55 IST

संबंधित बातम्या

×