आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदराबादचा क्रिकेटपटू शेरफेन रुदरफोर्डच्या वडिलांचे निधन झाले आहे. हैदराबाद संघाने त्याच्या वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त केला. या दु:खद घटनेमुळे रुदरफोर्ड संघाच्या बायो बबलमधून बाहेर पडला असून तो यूएईहून आपल्या मायदेशी रवाना झाला आहे.

रुदरफोर्डने इन्स्टाग्रामवर आपल्या वडिलांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत म्हटले, ”मृत्यू ही आयुष्यातील नेहमीच एक कठीण गोष्ट राहिली आहे आणि ती का घडते? या प्रश्नाचे उत्तर मी विचारतोय, हे फक्त देवालाच माहीत आहे. पण माझे वडील आता आयुष्यभर माझ्यापासून दूर गेले आहेत. माझे ह्रदय तुटले आहे. माझ्या घरी येण्याच्या अनेक योजना होत्या, मला तुम्हाला सीपीएल जर्सी घालून माझ्या यशाचा आनंद सोबत साजरा करायचा होता. पण तसे झाले नाही. देवा, मी प्रार्थना करतो की तू मला या काळातून घेऊन जा, मी ते सहन करू शकत नाही, माझे बाबा मला काहीही न सांगता कसे सोडून जाऊ शकतात.?”

हेही वाचा – ‘‘पाकिस्तान हा जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक, त्यामुळे…”

यंदाच्या हंगामात आठव्या सामन्यात सातव्यांदा पराभव पत्करावा लागल्यानंतर सनरायझर्स हैदराबादची प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता संपली आहे. दुसऱ्या टप्प्यात हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना गमावला. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबादचा संघ निर्धारित २० षटकांत दिल्लीविरुद्ध ९ गडी बाद १३४ धावा करू शकला. प्रत्युत्तरात दिल्लीने हे आव्हान १३ चेंडू आणि ८ गडी राखून सहज साध्य केले.