आयसीसीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची टी-२० विश्वचषक २०२४ साठी अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. यासह तो ख्रिस गेल, युवराज सिंग आणि उसेन बोल्टच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. पण यादरम्यानच एका पाकिस्तानी रिपोर्टरने भारत वि पाकिस्तान असा सोशल मीडियावर वाद सुरू केला आहे. यादरम्यान त्याने सुरेश रैनाला प्रश्न विचारत स्वतच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली.

एका पाकिस्तानी पत्रकाराने त्याच्या एक्स अकाऊंटवर शाहीद आफ्रिदी आणि सुरेश रैनाचा कॉमेंट्री करतानाचा असे फोटो पोस्ट केले. शाहीद आफ्रिदीला आयसीसीने टी-२० वर्ल्डकपचा अ‍ॅम्बेसेडर नेमल्यानंतरची ही पोस्ट आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटले, “ICC ने शाहीद आफ्रिदीला T20 विश्वचषक २०२४ साठी अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. हॅलो सुरेश रैना?”

Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Sachin Tendulkar emptional post for Daughter Sara who Completes Her Masters with Distinction
सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीची उत्तुंग भरारी! साराने ‘या’ विषयात मिळवली मास्टर्स डिग्री; मास्टर ब्लास्टरची भावुक पोस्ट
BCCI Secretary Jai Shah clarification regarding the coaching position that he has no contact with former Australian players
ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंशी संपर्क नाही; प्रशिक्षकपदाबाबत ‘बीसीसीआय’ सचिव जय शहा यांचे स्पष्टीकरण
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Hardik Natasa not staying together said their friend
हार्दिक-नताशाच्या मित्राचे घटस्फोट प्रकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाला, दोघेही अनेक महिन्यांपासून….
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Video Neeta Ambani Requesting Chats With Rohit Sharma
नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा

खरंतर ही पोस्ट करण्यामागचं कारण आहे पहिल्या क्वालिफायरमधील सुरेश रैनाचं मजेदार वक्तव्य. अहमदाबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि केकेआर यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यादरम्यान ही घटना घडली. आकाश चोप्राने त्याला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत विचारले. चोप्रा म्हणाले की, जर तुला पुन्हा मैदानावर परतायचे असेल तर तू येऊ शकतोस.

या प्रश्नावर रैना स्वतः हसायला लागला आणि म्हणाला की मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही. हे ऐकून चोप्राही जोरात हसले. रैनाने केवळ एका ओळीने आफ्रिदीला ट्रोल केले. आफ्रिदी निवृत्तीनंतरही क्रिकेटच्या मैदानात परतला होता. आफ्रिदी एकदा नव्हे तर अनेकदा असे केले आहे. रैना आणि चोप्राच्या संभाषणाचा व्हिडिओही कुणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. याच संभाषणाच्या व्हीडिओमधील स्क्रिनशॉट या पाकिस्तानी पत्रकाराने या पोस्टमध्ये शेअर केला. सुरेश रैनाने २०२० मध्ये निवृत्ती जाहीर केली होती.

टीम इंडियाच्या माजी स्टार क्रिकेटरने पाकिस्तानी पत्रकाराला सडेतोड प्रत्युत्तर दिले आणि लिहिले, “मी ICC ॲम्बेसेडर नाही, पण २०११ चा वर्ल्डकप आम्ही जिंकला आहे. मोहालीमधील सामना आठवतोय का? आशा आहे की यामुळे तुमच्या काही अविस्मरणीय आठवणी पुन्हा ताज्या होतील.” यानंतर चाहत्यांनी या पोस्टवर पाकिस्तानी पत्रकाराची चांगलीच फिरकी घेतली आहे. भारताने २०११ च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता, जो मोहालीमध्ये खेळवण्यात आला होता.

यंदाचा टी-२० विश्वचषक १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसए यांच्या संयुक्त विद्यमाने टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, तर अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे. भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर ९ जून रोजी टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.