सूर्यकुमार यादवचा इन्स्टाग्रामवरील व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. सूर्या या व्हीडिओमध्ये श्रेयंका पाटीलसह डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार आणि श्रेयंका एका चालत्या कार्टमध्ये नाचताना दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्या आहेत.

सूर्यकुमार यादववर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली आहे आणि आता तो पूर्वीपेक्षा खूपच तंदुरुस्त दिसत आहे. तर श्रेयंका पाटीलला २०२४ च्या महिला प्रीमियर लीगपूर्वी दुखापत झाली होती आणि त्यामुळे ती या स्पर्धेतून बाहेर पडली होती. सूर्या आणि श्रेयंका सध्या जिममध्ये घाम गाळत असून आपला फिटनेस परत मिळवत आहेत. यादरम्यान दोघांनीही छोटा ब्रेक घेत हा व्हीडिओ केला आहे. पण सूर्यकुमार यादवने काही वेळातच हा व्हीडिओ डिलीट केला आहे.

अलिकडेच, ११ वर्षांच्या मुलाचा बोट रेसिंगमधील ‘ऑरा फार्मिंग’ नृत्य सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. सूर्यादादाने ट्रेंड फॉलो करत हा व्हीडिओ तयार करत शेअर केला आहे. या ११ वर्षांच्या मुलाने बोट रेसिंग दरम्यान डान्स केला होता, त्याचा व्हीडिओ पाहून सर्वच जण चकित झाले आणि पाहता पाहता हा व्हीडिओ व्हायरल झाला. आता सूर्यकुमार यादव आणि श्रेयंका पाटील यांनी या व्हीडिओचा ट्रेंड फॉलो करत व्हीडिओ शेअर केला आहे. सूर्यकुमार यादवने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘मॅनेजरने बोला ट्रेंड करने का तो कर.’

श्रेयंका पाटिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारत अ संघामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. पण ती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण होऊ शकली नाही आणि त्यामुळे तिला संघातून वगळण्यात आले. श्रेयंका पाटील एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहे आणि तिने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर सामने फिरवले आहेत. त्यामुळे श्रेयंकाने लवकरात लवकर संघात पुनरागमन करण्याची सर्वच जण वाट पाहत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर सूर्यकुमार यादव आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसला होता. यानंतर सूर्यकुमार यादववर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर आशिया कप २०२५ मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली संघ खेळताना दिसेल. आशिया कप हा टी-२० विश्वचषकाचा विचार करता टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.