माजी दिग्गज जलतरणपटू बुला चौधरी यांच्या राहत्या घरात चोरांनी घुसून त्यांच्या ट्रॉफी आणि मेडल्सची चोरी केली आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी येथे त्या वास्तव्याला आहेत. त्यांच्या ट्रॉफी कॅबिनेटमध्ये अनेक पुरस्कार होते, ज्यात दीड दशकाहून अधिक काळच्या कारकिर्दीत त्यांनी जिंकलेली १५० हून अधिक पदकं आणि स्मृतिचिन्हे होती.
२००९ मध्ये त्यांना मिळालेला पद्मश्री आणि दक्षिण आशियाई फेडरेशन (SAF) गेम्सच्या दोन चक्रांमध्ये त्यांनी जिंकलेली १० सुवर्णपदकं देखील चोरीला गेली. बुला चौधरी म्हणाल्या की, त्यांनी (चोरांनी) माझ्याकडून अशा गोष्टी हिसकावून घेतल्या ज्या त्यांच्यासाठी खूप अमूल्य आहेत.
चोरांनी मागच्या दाराने आत प्रवेश केला आणि पद्मश्री, राष्ट्रपती पुरस्कार, सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकं तसेच विदेशी पुरस्कारांसह अनेक पदकं चोरली. त्यांनी घरातील वस्तूंचेही नुकसान केले आणि बाथरूमच्या बेसिन आणि नळही चोरला.
पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करत पदकं केली परत
पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील माजी राष्ट्रीय जलतरण विजेत्या बुला चौधरी यांची चोरीला गेलेली २९५ पदकं, ज्यात सुवर्णपदकं आणि पद्मश्री पदकं समाविष्ट होती ती पोलिसांनी जप्त केली आणि रविवारी रिश्रा परिसरातून एका व्यक्तीला अटक केली आहे.
बुला चौधरी यांच्या घऱी कशी चोरी झाली?
सध्या कोलकाता येथे त्यांच्या कुटुंबासह राहणाऱ्या बुला चौधरी अधूनमधून त्यांच्या वडिलोपार्जित घरी जातात. त्यांचा भाऊ, डोलन चौधरी, घराची देखरेख आणि तिथे तिच्या आजी-आजोबांसह राहतो.
दरोड्यानंतर, डोलन यांनी निराशा व्यक्त केली की घरात यापूर्वी तीन वेळा चोरी झाली होती आणि पोलिसांकडे तक्रारी करूनही घटना सुरूच राहिल्या. पूर्वी एक पोलिस चौकी उभारण्यात आली होती परंतु नंतर ती काढून टाकण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि उत्तरा उत्तरपारा पोलिस स्टेशनचे आयसी अमिताभ सन्याल घटनास्थळी पोहोचले आहेत.
बुला चौधरींच्या कुटुंबाला या चोरी प्रकरणानंतर असुरक्षित असल्यासारखे वाटत आहे. याच घरात दरोड्याची ही चौथी घटना आहे. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हेगारांना पकडण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
सुंदर बारी नावाच्या या घरात ही तिसरी चोरी आहे. २०१४ मध्ये, सात महिन्यांच्या कालावधीत या घरात दोनदा चोरी झाली होती. त्यावेळी दागिने, स्मृतिचिन्हे आणि एक एलईडी टीव्ही यासह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीला गेल्या होत्या.