टेनिसविश्वात रॉजर फेडररचे नाव फार सन्मानाने घेतले जाते. स्वित्झर्लंडच्या या महान टेनिसपटूने विक्रमांची अनेक शिखरे सर करत आपले आणि आपल्या देशाचे नाव उंचावर नेऊन ठेवले आहे. त्याच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी स्वित्झर्लंड फेडररच्या वाढदिवशी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 8 ऑगस्ट म्हणजेच फेडररच्या 40व्या जन्मदिवशी स्वित्झर्लंड आपला नवीन राष्ट्रीय दिवस साजरा करण्याची तयारी करत  असल्याचे वृत्त आहे. 1 ऑगस्ट हा स्वित्झर्लंडचा राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेडररचा असा सन्मान करण्यात आला तर, जगातील कोणत्याही देशाने क्रीडा क्षेत्रातील संबंधित व्यक्तीला दिलेली ही पहिलीच भेट असेल. याबाबतची प्रक्रिया स्वित्झर्लंडच्या संसदेत सुरू झाली. अनेक खासदारांनी फेडररचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यासाठी सोशल मीडियावर एक उपक्रम सुरू केला. स्वित्झर्लंडने मागील वर्षीही अनोख्या प्रकारे फेडररचा सन्मान केला होता. फेडररच्या सन्मानार्थ स्वित्झर्लंडने 20 फ्रँक चांदीची नाणी समोर आणली होती.

फेडरर स्वित्झर्लंड टूरिझमचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

स्विस मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेनिसपटू रॉजर फेडररला स्वित्झर्लंड टूरिझमचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेमण्यात आले आहे. वर्षानुवर्षे स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फेडररने स्विस राष्ट्रीय पर्यटन मंडळाबरोबर दीर्घकालीन करार केला आहे. याचा उद्देश स्वित्झर्लंडमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे आहे.

फेडरर आणि स्वित्झर्लंड जागतिक स्तरावर देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एकत्र काम करतील. कोरोनाचा संपूर्ण जगात पर्यटन क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. “पर्यटनाला चालना देण्यासाठी फेडरर ही योग्य व्यक्ती आहे”, असे स्वित्झर्लंडच्या पर्यटन मुख्य कार्यकारी अधिकारी माऊट निडेगर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Switzerland could shift national day august 8 in order to honour roger federer adn
First published on: 02-04-2021 at 16:03 IST