T20 WC: शार्दुल आणि इशानचा कपल डान्स; पार्टीत रोहित-कोहलीचे कुटुंब दिसले एकत्र

न्यूझीलंडविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये दिसले. खेळाडूंनी मुलांसाठी हॉटेलमध्ये हॅलोवीन पार्टीचं आयोजन केलं होतं.

Shardul_Ishan
(Photo-ritssajdeh Instagram)

टी २० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय फॅन्सची चिंता वाढली आहे. त्यात न्यूझीलंडसोबतचा सामना काही करून जिंकावा लागणार आहे. त्यात अफगाणिस्तानच्या धावगतीमुळे दोन्ही संघाची डोकेदुखी वाढली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ‘करो या मरो’ सामन्यापूर्वी भारतीय संघाचे खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये दिसले. भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी मुलांसाठी हॉटेलमध्ये हॅलोवीन पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत मुलांसोबत क्रिकेटपटूंनी आनंद लुटला.

विराट कोहलीची मुलगी वामिका, रोहित शर्माची मुलगी समायरा, आर. अश्विनची मुलगी आध्या आणि अकिरा यांच्यासह हार्दिक पंड्याचा मुलगा अगस्त्य या पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी मुलांनी छान छान ड्रेस परिधान करून हॅलोवीन पार्टी केली. मुलांच्या पार्टीत इशान किशन आणि शार्दुल ठाकुर कपल डान्स करताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह त्यांचा व्हिडिओ अधिकृत खातं असलेल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने हॅलोवीन पार्टीत मुलांना चॉकलेटं वाटली. तर श्रेयस अय्यर मुलांना कार्ड ट्रिक दाखवली.

टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केलं आहे. तर भारत आणि न्यूझीलंड सामन्यातून चित्र स्पष्ट होणार आहे. तर अफगाणिस्तानची धावगती चांगली असल्याने भारत आणि न्यूझीलंडची चिंता वाढली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 wc ishan kishan and shardul thakur couple dance in halloween parrty rmt

Next Story
विश्वचषक.. पाकिस्तान आणि विराट