पाकिस्तानचे सलामीचे फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. बाबर आझम पाठोपाठ आता मोहम्मद रिझवानच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला आहे. टी २० वर्ल्डकपमध्ये मोहम्मद रिझवानने आतापर्यंत ३ अर्धशतकं झळकावली आहेत. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ५२ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. तर एका वर्षात टी २० स्पर्धेत १००० धावा करण्याचा विक्रम केला आहे. मोहम्मद रिझवाननंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा नंबर लागतो. त्याने एका वर्षात ८२६ धावा केल्या आहेत.

मोहम्मद रिझवानने भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५५ चेंडूत ७९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड विरुद्ध ३४ चेंडूत ३३ धावा, अफगाणिस्तान विरुद्ध ८ धावा, नामिबिया विरुद्ध ५० चेंडूत ७९ धावा, स्कॉटलँड विरुद्ध १५ धावा केल्या होत्या. मोहम्मद रिझवानने ६ सामन्यात एकूण २८१ धावा केल्या असून दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ३०३ धावांसह बाबर आझम आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
पाकिस्तान – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हसन अली, हॅरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.

ऑस्ट्रेलिया – आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.