T20 World Cup 2020 : धोनीला स्थान नाही; शुभमन गिल संघात

दोन यष्टीरक्षकांना संघात संधी

विराट कोहलीच्या भारतीय संघाने नव्या वर्षाची सुरूवात विजयाने केली. इंदूरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेवर ७ गडी राखून मात केली. या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं भारतीय संघासाठी अनिवार्य होतं. सामन्यातील विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

‘कॉफी विथ करण’ प्रकरणावर हार्दिकने अखेर सोडलं मौन, म्हणाला…

T20 World Cup 2020 ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. यंदाच्या वर्षी होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने २०२० मधील भारताचे सर्व टी २० सामने महत्त्वाचे आहेत. विश्वचषकासाठी सर्वोत्तम खेळाडू पाठवले जावेत यासाठी भारतीय संघ निवड समिती खेळाडूंची चाचपणी करत आहेत. त्यामुळे काही तरूण खेळाडूंना देखील संघात स्थान देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिस याने त्याला पात्र वाटणाऱ्या खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर केला आहे.

IND vs AUS : भारताला भारतातच हरवू – अ‍ॅरोन फिंच

स्कॉट स्टायरिस

 

T20 World Cup 2020 साठी स्कॉट स्टायरिसने निवडलेला संघ –

फलंदाज – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल
यष्टीरक्षक – ऋषभ पंत, संजू सॅमसन
अष्टपैलू – हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा
गोलंदाज – जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप चहल, नवदीप सैनी, दीपक चहर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup 2020 team india squad no place for ms dhoni shubman gill in team according to scott styris vjb

ताज्या बातम्या