तिसऱ्या कसोटीत भरताने इंग्लंडवर दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. सामना संपल्यावर माजी इंग्लिश खेळाडू केविन पीटरसनने खेळपट्टीसंदर्भात टिपण्णी केली. त्याला मुंबईकर वासिम जाफरने मस्त प्रत्युत्तर दिले.

Ind vs Eng: विराटने ठेवलं अश्विनचं नवीन नाव

“फलंदाजांच्या तंत्राचा आणि प्रतिभेचा कस लागेल अशी खेळपट्टी एखाद्या सामन्यासाठी ठीक आहे. पण अशा प्रकारची खेळपट्टी पुन्हा मला पाहायला आवडणार नाही. आणि कदाचित साऱ्या खेळाडूंनाही अशा खेळपट्टीवर खेळायची इच्छा नसेल. असो… भारतीय संघाचे अभिनंदन!”, असे ट्वीट पीटरसनने केले. त्यावर वासिम जाफरने एक फोटो पोस्ट करत पीटरसनला गप्प केलं. “तुम्ही लोकं खूपच नाटकं करता रे…”, अशा आशयाचा संदेश असलेला एक फोटो पोस्ट करत त्याने पीटरसनची खिल्ली उडवली.

“इंग्लंडने जे केलं तसं ‘टीम इंडिया’ने कधीच केलं नसतं…”

Video: “ए बापू, थारी बॉलिंग…”; विराटचं गुजराती ऐकून हार्दिक, अक्षर हसून लोटपोट

अशी रंगली तिसरी कसोटी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. त्यात केवळ झॅक क्रॉलीने अर्धशतक केले. तर अक्षर पटेलने ३८ धावांत ६ बळी टिपले. त्यानंतर भारताचा पहिला डावही स्वस्तात संपला. रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला कशीबशी १४५ धावांपर्यंत मजल मारणं शक्य झालं. कर्णधार जो रुटने अवघ्या ८ धावा देत ५ गडी टिपले. इंग्लंडचा दुसरा डावही लवकर संपुष्टात आला. अक्षरचे ५ तर अश्विनचे ४ बळी यांच्या जोरावर इंग्लंड ८१ धावांत गारद झाला. त्यानंतर चौथ्या डावात भारताने बिनबाद विजयासाठी आवश्यक असलेलं लक्ष्य गाठलं. सामन्यात ११ बळी टिपणारा अक्षर पटेल सामनावीर ठरला.