Mukesh Kumar Cryptic Instagram Post: भारतीय संघ कसोटी मालिकेत इंग्लंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून हेडिंग्लेच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय खेळाडू या सामन्याआधी कसून सराव करत आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने १८ सदस्यीय संघाची निवड केली होती. मात्र, पहिल्या सामन्याआधी वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड लायन्स संघाविरूद्ध झालेल्या पहि्या अनधिकृत कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना त्याने २७ षटकात ९९ धावा खर्च करत १ गडी बाद केला होता. दरम्यान हर्षित राणाला संघात स्थान मिळाल्यानंतर मुकेश कुमारने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी तुफान चर्चेत आहे.

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही. मात्र, त्याचा भारतीय अ संघात समावेश करण्यात आला. भारतीय अ संघाकडून खेळताना त्याने दमदार गोलंदाजी करत ३ गडी बाद केले. मात्र, त्यानंतर त्याला दुसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर झालेल्या इंट्रा स्क्वॉड सराव सामन्यातही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

आता मुकेश कुमारने इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे. ही स्टोरी त्याने कोणासाठी शेअर केली आहे, हे कळू शकलेलं नाही. मात्र, ही स्टोरी मुकेशने गौतम गंभीर आणि हर्षित राणासाठी शेअर करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी हर्षित राणाला मुख्य संघात स्थान मिळणं हे जर खटकणारं आहे. कारण त्याला भारतीय अ संघाकडून इंग्लंड लायन्सविरूद्ध एक सामना खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला केवळ एक गडी बाद करता आला. त्यानंतर इंट्रा स्क्वॉड सामन्यातही तो फ्लॉप राहिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुकेश कुमारने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “कर्मा वेळेची वाट पाहत आहे. तुम्हाला नेहमी सतर्क राहावं लागेल. कर्म कधीच माफ करत नाही, त्याचं फळ नक्की मिळतं.” एकटा मुकेश कुमार नाही, तर आणखी एक गोलंदाज आहे ज्याला संधी न मिळाल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतीय अ संघाकडून खेळताना अंशूल कंबोजने लक्षवेधी कामगिरी केली. त्याने रणजी स्पर्धेत केरळ संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात एकाच डावात १० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. मात्र, इतका दमदार रेकॉर्ड असूनही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.