Team India Record At Manchester: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्याला मँचेस्टरच्या मैदानावर सुरूवात झाली आहे. मालिकेतील ३ पैकी २ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे भारतीय संघाला जर मालिका जिंकायची असेल तर हा सामना जिंकून मालिका २-२ ने बरोबरीत आणावी लागणार आहे. दरम्यान ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर कशी आहे भारतीय संघाची कामगिरी? जाणून घ्या.
हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. मात्र या सामन्याआधी भारतीय संघाला मोठे धक्के बसले आहेत. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही.नितीश कुमार रेड्डी दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो मायदेशी परतला आहे. त्याच्या जागी शार्दुल ठाकूरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तर आकाशदीप दुखापतग्रस्त झाल्यामुळे अंशुल कंबोजचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या हाताला देखील दुखापत झाली आहे. त्यामुळे तो चौथ्या सामन्यातून बाहेर पडला आहे.
मँचेस्टरमध्ये कशी आहे भारतीय संघाची कामगिरी?
मँचेस्टरमध्ये भारतीय संघाचा विक्रम चिंताजनक राहिला आहे. मँचेस्टरच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ ९ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ १९३६ मध्ये मँचेस्टरमध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले होते. हा सामना ड्रॉ राहिला होता. त्यानंतर १९४६ मध्ये झालेला सामना देखील ड्रॉ राहिला होता. या ९ पैकी ४ सामने ड्रॉ झाले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मँचेस्टरमध्ये भारतीय संघाची कामगिरी
जुलै १९३५- ड्रॉ
जुलै १९४६ – ड्रॉ
जुलै १९५२- एक डाव आणि २०७ धावांनी पराभव
जुलै १९५९- १७१ धावांनी पराभव
ऑगस्ट १९७१- ड्रॉ
जून १९८२-ड्रॉ
ऑगस्ट १९९०- ड्रॉ
ऑगस्ट २०१४ – एक डाव ५४ धावांनी पराभव