रिओ ऑलिम्पिक आणि जागतिक हॉकी लीग अंतिम स्पध्रेच्या तयारीसाठी भारतीय पुरुष हॉकी संघ पुढील महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याकरिता भारतीय संघाची निवड करण्यात आली असून सरदार सिंग याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही स्पर्धा २ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत ऑकलंड, नेल्सन आणि ख्राइस्टचर्च येथे खेळविण्यात येणार आहे.
या दौऱ्यावर भारत सहा सामने खेळणार असून त्यापैकी दोन लढती न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध, तर चार सामने वरिष्ठ संघाविरुद्ध खेळविण्यात येणार आहेत. उच्च कामगिरी संचालक आणि मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ निवडण्यात आला आहे.
भारतीय संघ :
गोलरक्षक – पी. आर. श्रीजेश (उपकर्णधार), हरज्योत सिंग
बचावपटू – बिरेंद्र लाक्रा, कोथाजीत सिंग, व्ही. आर. रघुनाथ, जसजीत सिंग कुलर, रुपिंदरपाल सिंग, गुरजिंदर सिंग
मध्यरक्षक – सरदार सिंग (कर्णधार), चिंग्लेन्सना सिंग, एस. के. उथप्पा, सतबीर सिंग, देविंदर वाल्मीकी, मनप्रीत सिंग, धरमवीर सिंग
आघाडीपटू – एस.व्ही. सुनील, रामदीप सिंग, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्ये, निक्कीन थिम्मायाह.