Australia vs South Africa, WTC Final 2025: दक्षिण आफ्रिकेने इतिहासाला गवसणी घातली आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना एडेन मारक्रमने सर्वाधिक १३६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघाने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला. मारक्रमच्या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने विजयाचा कळस चढवला. मात्र, कर्णधार तेंबा बावुमाने महत्वपूर्ण खेळी करत या विजयाचा पाया रचला.
२७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास
दक्षिण आफ्रिकेसाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. कारण १९९८ नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेने आयसीसीची ट्रॉफी जिंकली आहे. २७ वर्ष या संघाला एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. त्यामुळे जिंकल्यानंतर जोरदार जल्लोष होणार, असं वाटलं होतं. ही पराभवाची मालिका दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून थांबवली आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी एका धावेची गरज असताना वेरियनने एक धाव घेत दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकून दिली.
तेंबा बावूमाचं सेलिब्रेशन
दक्षिण आफ्रिकेने विजयाची चव चाखताच कॅमेरामनने कॅमेरा दक्षिण आफ्रिकेच्या ड्रेसिंग रुमकडे वळवला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू जोरदार जल्लोष करताना दिसून आले. मात्र, कर्णधार तेंबा बावुमा शांत राहिला. ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची मेस उंचावली. त्यावेळी तेंबा बावुमा हटके सेलिब्रेशन करताना दिसून आला.
दक्षिण आफ्रिकेचा दमदार विजय
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मारक्रम आणि रायन रिकल्टनची जोडी मैदानावर आली. या जोडीला हवी तशी सुरूवात करता आली नाही. रायन रिलक्टन अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला. या जोडीला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही.
मात्र, त्यानंतर मुल्डर आणि मारक्रमने ६१ धावांची भागीदारी केली. मुल्डरने २७ धावा चोपल्या. ही जोडी फुटल्यानंतर एडेन मारक्रम आणि तेंबा बावूमा १५० हून अधिक धावांची भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला सामन्यात कमबॅक करून दिलं. बावूमाने ६६ धावांची खेळी केली. तर एडेन मारक्रमने १३६ धावा केल्या. शेवटी बेडिंघमने नाबाद २१ आणि काईल वेरीयनने नाबाद ४ धावा करत दक्षिण आफ्रिकेला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.