आपल्या खेळावर व आपल्यावर प्रेम करणाऱ्या समाजाचे आपण काही देणे लागतो हे ओळखत डॅझलिंग डय़ुसेस संघातील खेळाडू अंकिता रैना व तिच्या सहकारी खेळाडूंनी अंकिताचा वाढदिवस विशेष मुलांमध्ये जाऊन साजरा केला.
डॅझलिंग डय़ुसेस संघ येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र टेनिस लीगमध्ये सहभागी झाला आहे. मंगळवारी पुण्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू अंकिता रैना हिच्या वाढदिवसानिमित्त या संघातील मोहित मयूर, विजयसुंदर प्रशांत, दिविज शरण, आदित्य मडकईकर, त्रेता भट्टाचार्य या खेळाडूंनी ज्ञानगंगोत्री मतिमंद शाळेस भेट दिली. या मुलांना त्यांनी टेनिस खेळण्याचा आनंद मिळवून दिला. तसेच त्यांनी या संस्थेस भरघोस देणगीही दिली. या खेळाडूंबरोबर असलेले प्रशिक्षक मिहिर तेरणीकर, संघाचे मालक पवन मित्तल व मोहित गोयल यांनीही संस्थेस देणगी दिली.