महाराष्ट्राच्या आदित्य श्रीराम (अग्रमानांकित), सिद्धार्थ साबळे (तृतीय मानांकित) आदी खेळाडूंनी मुलांच्या सोलारिस चषक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेतील १४ वर्षांखालील गटात अपराजित्व राखले.
श्रीरामने आदित्य पवार याचा ७-० असा धुव्वा उडविला. साबळे याने आपलाच सहकारी अनिषकुमार याच्यावर ७-० असा दणदणीत विजय नोंदविला. राहुल मोटवानी याने मानस टेंब्रे याला ७-२ असे हरवित दुसरी फेरी गाठली. जय देवकर याला जयराम जैन याच्याविरुद्ध ७-१ असा विजय मिळविताना फारशी अडचण आली नाही. अर्चित सिन्हा याने ह्रदय सोनावणे याला ७-१ असे लीलया पराभूत केले. आर्य जाधव याने केरळच्या श्रीशैलेश हितेन याचे आव्हान ७-५ असे चुरशीच्या लढतीनंतर संपुष्टात आणले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Dec 2014 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राच्या खेळाडूंची आगेकूच राष्ट्रीय मानांकन टेनिस
महाराष्ट्राच्या आदित्य श्रीराम (अग्रमानांकित), सिद्धार्थ साबळे (तृतीय मानांकित) आदी खेळाडूंनी मुलांच्या सोलारिस चषक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेतील १४ वर्षांखालील गटात अपराजित्व राखले.
First published on: 21-12-2014 at 07:33 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tennis maharashtra team