राष्ट्रीय क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्राच्या मिलिका मराठेने हरयाणाच्या संदीप्ती सिंगचा ४-६, ६-४, ६-३ असा पराभव करून क्रिकेट क्लब ऑफ इंडियातर्फे आयोजित केलेल्या रमेश देसाई स्मृती राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पध्रेतील १२ वर्षांखालील मुलींच्या गटाचे जेतेपद पटकावले. मुलांमध्ये तामिळनाडूच्या द्वितीय मांनाकित संदीप व्ही. एम.ने तेलंगणच्या अव्वल मानांकित गौरव कुर्वाचा ६-३, ४-६, ६-२ असा पराभव केला. दुहेरी प्रकारात मुलींमध्ये गार्गी पवार आणि सुदीप्ता सेथीकुमार जोडीने रेश्मा मरुरी आणि भक्ती शाहचा ४-६, ६-३, १-८ असा पराभव केला. तर मुलांमध्ये निशांत डबास आणि कृष्णा हुडा जोडीने गौरव कुर्वा आणि संदीप व्ही. एम.ला ६-७ (८), ६-२, १०-८ असे पराभूत केले.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2015 रोजी प्रकाशित
टेनिस : महाराष्ट्राच्या मिलिका मराठेला जेतेपद
राष्ट्रीय क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्राच्या मिलिका मराठेने हरयाणाच्या संदीप्ती सिंगचा ४-६, ६-४, ६-३ असा पराभव करून क्रिकेट क्लब ऑफ इंडियातर्फे आयोजित केलेल्या रमेश देसाई स्मृती राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पध्रेतील १२ वर्षांखालील मुलींच्या गटाचे जेतेपद पटकावले.

First published on: 25-05-2015 at 02:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tennis mallika marathe