Premium

थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा: लक्ष्यचे आव्हान संपुष्टात

भारताचा आघाडीचा खेळाडू लक्ष्य सेनची घोडदौड संघर्षपूर्ण लढतीनंतर थायलंडच्या दुसऱ्या मानांकित कुनलावूत वितिदसार्नने २१-१३, १७-२१, १३-२१ अशी रोखली.

lakshya sen
लक्ष्य सेन

पीटीआय, बँकॉक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचे थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शनिवारी उपांत्य फेरीत संपुष्टात आले. भारताचा आघाडीचा खेळाडू लक्ष्य सेनची घोडदौड संघर्षपूर्ण लढतीनंतर थायलंडच्या दुसऱ्या मानांकित कुनलावूत वितिदसार्नने २१-१३, १७-२१, १३-२१ अशी रोखली.उपांत्य फेरीच्या लढतीत लक्ष्य प्रत्येक गुणासाठी नेटाने लढला. मात्र, १ तास १५ मिनिटांच्या प्रदीर्घ लढतीनंतर लक्ष्यला पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामात लक्ष्य प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत पोचला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 00:19 IST
Next Story
अल्कराझ, त्सित्सिपासची आगेकूच, रुनचाही उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; महिलांत श्वीऑनटेक विजयी