Ashes 2023 Michael Vaughan Kevin Pietersen: इंग्लंडने गेल्या वर्षी ब्रेंडन मॅक्क्युलमला कसोटीत मुख्य प्रशिक्षक बनवले होते. तेव्हापासून संघाची खेळण्याची पद्धत बदलली आहे. कसोटीतील संघाचा दृष्टिकोन व नडे आणि टी२० सारखा आहे. याबरोबरचं धाडसी निर्णयही घेतले जात आहेत. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाला. या ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवला जात आहे.

पहिल्या दिवशी स्टोक्सने डाव घोषित केला

कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने आपला डाव घोषित केला. कर्णधार बेन स्टोक्सने डाव घोषित करण्याचा संकेत देताच इंग्लंडची धावसंख्या ७८ षटकांत ८ बाद ३९३ अशी होती. जो रूट शतक झळकावल्यानंतर नाबाद खेळत होता. दुसरा कोणताही संघ असता तर त्यांनी धावसंख्या मोठी करण्याचा प्रयत्न केला असता. पण इंग्लंडने हे केले नाही. जो रूट ११८ धावांची इनिंग खेळल्यानंतर नाबाद राहिला.

Royal Challengers Bangalore Vs Kolkata Knight Riders Match Highlights in Marathi
KKR vs RCB : रोमहर्षक सामन्यात केकेआरचा आरसीबीवर एका धावेने निसटता विजय, विल जॅक्सची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ
Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad Updates in marathi
IPL 2024 : ट्रॅव्हिस हेडने झळकावले वादळी शतक, आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

हेही वाचा: World Father’s Day: शतकवीर उस्मान ख्वाजा लाडक्या लेकीला घेऊन पत्रकार परिषदेत पोहचला आणि…, Video पाहा

वॉन आणि पीटरसन संतापले

इंग्लंडचे दोन माजी कर्णधार मायकेल वॉन आणि केविन पीटरसन यांना डाव घोषित करण्याची रणनीती आवडली नाही. मायकेल वॉन म्हणाला, “मी जर कर्णधार असतो तर कधीही डाव घोषित केला नसता. संघासाठी मला आणखी काही धावा हव्या होत्या, विशेषत: जेव्हा जो रूट क्रीजवर उभा होता. त्याच वेळी, इंग्लिश क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक केविन पीटरसन म्हणाला, “मला वाटत नाही की ही त्याच्या (बेन स्टोक्स)  सुपीक डोक्यात अशी कल्पना आली असेल. मात्र, याचे खात्रीलायक उत्तर देणे कठीण आहे कारण अजून तो नवीन असून त्याला फारसे पाहिले नाही.

हेही वाचा: ODI WC2023: पाकिस्तानचा आडमुठेपणा! सामन्यांच्या ठिकाणांवरून BCCIवर केला आरोप, म्हणाले, “जाणूनबुजून असे वेळापत्रक…”

काय म्हणाला मायकल वॉन?

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन म्हणाला की, “कुठलाही कर्णधार असा मूर्खपणाचा निर्णय कधीच घेत नाही. विशेषत: जो रूटसारखा खेळाडू संघात असताना मी आधी सल्ला घेतला असता. ४८ वर्षीय वॉन असेही पुढे म्हणाला की, “इंग्लंड एक संदेश देण्याचा प्रयत्न करत होता, जो आधी कुठल्याही संघाने दिला नव्हता. याला जोडूनच पुढे पीटरसन म्हणाला की, “ही विकेट फलंदाजीसाठी चांगली मिळेल. शनिवारी फलंदाजी करणे सर्वोत्तम असेल आणि म्हणूनच मला घोषित करणे आवडले नाही.” यासर्व पार्श्वभूमीवर इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने आपल्या कर्णधाराचा बचाव केला आहे. तो म्हणतो की, “हा एक धाडसी आणि चांगला निर्णय होता. कदाचित त्याच्या या निर्णयाने संघ सामना देखील जिंकू शकतो.”