scorecardresearch

Premium

AUS vs PAK Test : ना षटकार, ना चौकार, तरी एका चेंडूवर दिल्या सात धावा, पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाचा VIDEO व्हायरल

PAK vs AUS Test Series Updates : पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी चार दिवसांचा सराव सामना खेळत आहे, ज्यामध्ये क्षेत्ररक्षकांनी मोठी चूक केली आणि ७ धावा दिल्या.

Pakistan Cricket team Bad Fielding video viral
पाकिस्तान क्रिकेट संघाची खराब क्षेत्ररक्षण (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Pakistan Cricket team Bad Fielding video viral : पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. हा संघ सर्वात जास्त आपल्या खराब क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत राहतो. शान मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे पाकिस्तानच्या खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षणामुळे एका चेंडूवर विरोधी संघाला सात धावा दिल्या आहेत.

पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण त्याआधी, मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध चार दिवसांचा सराव सामना खेळत आहे, ज्याचे तीन दिवस पूर्ण झाले आहेत. या सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षणात मोठी चूक केली, त्यामुळे एका चेंडूवर ७ धावा गमावल्या. या खराब क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kraig Brathwaite on Rodney Hodge
AUS vs WI : माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने वेस्ट इंडिजच्या क्षमतेवर उपस्थित केले होते प्रश्न, क्रेग ब्रॅथवेटने दंड दाखवत दिले प्रत्युत्तर
IND vs ENG 1st Test Match Updates in marathi
IND vs ENG : टीम इंडियाच्या फलंदाजांनी टॉम हार्टलीसमोर टेकले गुडघे, इंग्लंडचा भारतावर २८ धावांनी दणदणीत विजय
Video of umpire in Sindh Premier League goes viral
SPL 2024 : अंपायरने अपील न होताच फलंदाजाला केले बाद घोषित, पाकिस्तानमधील सामन्यातील VIDEO होतोय व्हायरल
India vs England first test match from today in Hyderabad sport news
भारताची फिरकी ‘बॅझबॉल’ला रोखणार? इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना आजपासून हैदराबादमध्ये; अश्विन, जडेजावर नजरा

पाकिस्तान संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ व्हायरल –

व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमद चेंडू टाकत असल्याचे दिसून येते, जो ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू रेनशॉ लाँग ऑफच्या दिशेने मारतो आणि तीन धावा घेत आपले अर्धशतक पूर्ण करतो, तोपर्यंत पाक क्षेत्ररक्षक चेंडूला सीमारेषेपूर्वी अडवतो आणि गोलंदाजांकडे फेकतो. पण यानंतर, बॉलिंग एंडला चेंडू पकडल्यानंतर बाबर आझमने हा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकतो. त्यानंतर हा चेंडू तिथून थेट सीमारेषेच्या बाहेर जातो. अशा प्रकारे पाकिस्तानला एका चेंडूवर ७ धावा गमवाव्या लागल्या.

हेही वाचा – MS Dhoni : “जर २० किलो वजन कमी केले, तर मी आयपीएलमध्ये…”, अफगाणिस्तानच्या खेळाडूचा माहीबद्दल मोठा खुलासा

तिसऱ्या दिवसअखेर पंतप्रधान इलेव्हन २४ धावांनी पिछाडीवर –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ३९१ धावा करून डाव घोषित केला. त्यानंतर पंतप्रधान इलेव्हनने डावाला सुरुवात केली. या संघाने तिसऱ्या दिवसअखेर ४ गडी गमावून ३६७ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे पंतप्रधान इलेव्हन २४ धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू रेनशॉ १३६ धावांवर खेळत आहे. त्याच्यासोबत ब्यू वेबस्टर २१ धावांवर नाबाद आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The video of pakistan cricket team losing seven runs on one ball due to poor fielding went viral vbm

First published on: 08-12-2023 at 18:34 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×