भूतानमध्ये होणारी ‘टूर ऑफ ड्रॅगन’ सायकल स्पर्धा ही ‘डेथ रेस’ म्हणून ओळखली जाते. नाशिकचे सायकलपटू डॉ. हितेंद्र आणि डॉ. महेंद्र महाजन हे दोन भाऊ आणि त्यांच्या समवेत किशोर काळे हे तिघेजण ‘डेथ रेस’ मध्ये सहभागी होणार आहेत. २६ ऑगस्टला ते कठीण अशा शर्यतीत सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत. हिमालयाचे अद्भुत निसर्ग आणि कठीण वातावरणाची, चढ-उतार असलेले खडकाळ आणि मातीचे रस्ते यांची अनुभूती देणारी स्पर्धा दि. २ सप्टेंबर रोजी होत आहे.भूतान ऑलिम्पिक कमिटीयांच्याद्वारे ही ‘टूर ऑफ ड्रॅगन’ सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या सायकलपटूस १ लाख ५० हजाराचे पारितोषिक देण्यात येते. २०१५ मध्ये अमेरिकेतील ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ पूर्ण केल्यानंतर डॉ. महाजन बंधुंनी भारतात आयोजित करण्यात आलेली गोल्डन क्वाड्रीलेटरल शर्यत पूर्ण केली होती. त्यानंतर ते पुन्हा एकदा’डेथ रेस’ मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. २०१२ मध्ये या रेसमध्ये सहभागी झालेल्या डॉक्टर बंधूंपैकी महेंद्र महाजन यांनी शर्यत पूर्ण केली होती. मात्र डॉ. हितेंद्र यांना ही शर्यत वेळेत पूर्ण करता आली नव्हती. यावेळी या दोन बंधूसोबत  नाशिकचे सायकलपटू किशोर काळे सुद्धा स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three nashik cyclist participate tour of the dragon bicycle race in bhutan
First published on: 27-07-2017 at 12:29 IST