मायकेल क्लार्कने संघाच्या नव्या विचारसरणी व खेळण्याच्या पद्धतीवर टीका केली असली तरी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘‘आम्ही कोणाचाही आदर मिळवण्यासाठी किंवा चाहत्यांना आमचा खेळ व स्वभाव आवडावा यासाठी खेळत नाही. क्रिकेट हा ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ असून यामध्ये प्रतिस्पर्धी संघाचा आदर केल्यास तुमची प्रतिष्ठा कमी होत नाही.’’

‘‘आम्ही ऑस्ट्रेलियन पद्धतीनेच खेळ खेळत आलो आहोत व यापुढेही अशाच प्रकारचा खेळ करू. त्यामुळे इतर कोणतीही व्यक्ती काय मत व्यक्त करते,’’ याविषयी मला काहीही देणेघेणे नाही, असेही पेनने सांगितले. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यापूर्वी व सामन्यानंतरदेखील संघातील सर्व खेळाडूंशी हात मिळवण्याची नवी प्रथा सुरू केली, त्यावरूनच क्लार्कने त्यांना सुनावले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.