भारताच्या नीरज चोप्राने आज ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं. मात्र नीरजच्या या पराक्रमानंतर त्यांच्यासंदर्भात इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्च केल्या जात अशतानाच नीरज चोप्रा रोड मराठा असल्याचंही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचसंदर्भात मागोवा घेतला असता ‘हिंदुस्थान टाइम्स’ला नीरजने दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये एक उल्लेख सापडतो.

या मुलाखतीच्या सुरवातीलाच नीरज हा रोड मराठा असल्याचा उल्लेख आहे. “काही शतकांआधी त्याचे (नीरजचे) पूर्वज हरयाणामध्ये स्थलांतरीत झाले. बाजीराव पेशव्यांनी पानिपतमध्ये लढलेल्या तिसऱ्या लढाईमध्ये ते लढले होते. नीरज हा याच रोड मराठ्यांचा वंशज असून भालाफेक या पूर्वापार चालत आलेल्या कौशल्याच्या मदतीने तो आपल्या पूर्वजांची परंपरा पुढे नेत आहे,” असं हिंदुस्थान टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्सची ही संपूर्ण मुलाखत तुम्ही येथे क्लिक करुन वाचू शकता.

Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

नक्की पाहा हे फोटो >> …अन् गोल्ड मेडल नीरजच्या गळ्यात; डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावेत असे ‘सुवर्ण’क्षण

नीरज यापूर्वी कोणत्या स्पर्धांमध्ये जिंकलाय?

यापूर्वी नीरजने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.

नक्की वाचा >> नीरज चोप्राचं पंतप्रधान मोदींबद्दलचं दोन वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल; म्हणाला होता, “ऐतिहासिक…”

१२१ वर्षांनंतर…

ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.

नक्की पाहा >> जन गण मन… १३ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये वाजलं भारताचं राष्ट्रगीत; Video पाहताच अंगावर काटा येईल

पाकिस्तानी खेळाडू पाचव्या स्थानी…

चेक रिपब्लिकच्या वडलेज आणि वेसेलीने अनुक्रमे रजत आणि कांस्य पदकावर नाव कोरलं. नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते ज्यात पाकिस्तानच्या अर्शद नदीमचाही समावेश होता. वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक अंतिम सामन्यात खेळले. अंतिम सामन्यामध्ये नदीम पाचव्या स्थानी राहिला. नदीमने ८४.६२ मीटरपर्यंत भाला फेकला. नदीमच्या आदी जर्मनीचा वेबर ने चौथा क्रमांक पटावला. वेबर ने ८५.३० मीटरपर्यंत भाला फेकला.