टेबल टेनिस : शरथची कमाल!

तिसऱ्या फेरीत प्रवेश; मनिका, सुतिर्था पराभूत

तिसऱ्या फेरीत प्रवेश; मनिका, सुतिर्था पराभूत

टोक्यो : ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी टेबल टेनिसमध्ये भारताच्या शरथ कमलने कमाल करताना पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली. मनिका बत्रा, सुतिर्था मुखजी यांना पराभव पत्करावा लागल्याने भारताचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. ३९ वर्षीय शरथने पोर्तुगालच्या थिआगो अपोलोनिआवर ४-२ (२-११, ११-८, ११-५, ९-११, ११-६, ११-९) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. आता मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या फेरीतील लढतीत शरथसमोर चीनचा रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मा लाँग याचे कडवे आव्हान असेल. महिलांमध्ये ऑस्ट्रियाच्या सोफिआ पोलकॅनोव्हाने मनिकाला ४-० (११-८, ११-२, ११-५, ११-७) अशी सरळ चार गेममध्ये धूळ चारली. तर सुतिर्थाला पोर्तुगालच्या फू यू हिने ४-० (११-३, ११-३, ११-५, ११-५) असे नामोहरम केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tokyo olympics sharath kamal reached in third round of table tennis zws

ताज्या बातम्या