जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोव्हिकवर ६-४, ७-६ (८-६) असा विजय मिळवत लिंझ टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. या जेतेपदासह २२ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत इस्तंबूल येथे होणाऱ्या डब्ल्यूटीए अजिंक्यपद फायनल्स स्पर्धेसाठी कर्बर पात्र ठरली आहे. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या कर्बरने १ तास आणि ३७ मिनिटांत या मोसमातील पहिल्यावहिल्या जेतेपदाची कमाई केली. कर्बरचे कारकीर्दीतील हे तिसरे जेतेपद आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल आठ खेळाडूंनाच या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते.