सुवर्णपदक मिळवण्यात माझे प्रशिक्षक आणि सहयोगी कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे उद्गार युवा बॉक्सिंगपटू शिवा थापाने काढले.
आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या शिवा थापाचे शुक्रवरी गुवाहाटीतील  लोकोप्रिया गोपिनाथ बोडरेलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिशय जल्लोषात शिवाचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार, बॉक्सिंग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विमानतळापासून त्याच्या घरापर्यंत त्याची मिरवणूक काढण्यात आली होती.
 ‘‘सुवर्णपदकाने प्रचंड आनंद झाला आहे. अथक परिश्रमाचे हे फळ आहे. क्षमतेला साजेशी कामगिरी करण्यासाठी मी आतुर होतो. माझ्यासह संपूर्ण भारतीय संघाने शानदार कामगिरी केल्याने आनंद द्विगुणित झाला आहे,’’ असे त्याने सांगितले.
जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा आणि रिओ ऑलिम्पिक यांच्या सरावासाठी पटियाला येथे राष्ट्रीय शिबिरासाठी रवाना होण्यापूर्वी काही दिवस कुटुंबियांसमेवत घालवणार असल्याचे शिवाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trainer has share in my success shiva thapa
First published on: 13-07-2013 at 07:42 IST