इंटरनेटवरील सोशल नेटवर्कींक साईट ट्विटरचा वापर करून इंग्लंडचा माजी कर्णधार केवीन पीटरसनने आपल्या भारतीय व्हिसा संबंधिची अडचण त्वरित सोडविली. ट्विटर इफेक्ट केवीनसाठी चांगलाच उपयोगी ठरला.
भारतीय व्हिसा मिळविण्यासंबंधी अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे ट्विट पीटरसनने पोस्ट केले आणि लगेच काही तासांत केवीनच्या अडचणी दूर झाल्या. केवीनने आपल्या @KP24 या ट्विटर निर्देशकावरून इंग्लंडमधील भारतीय दूतावासात आपला व्हिसा गेल्या दहा दिवसांपासून काही कारणास्तव वेगवेगळ्या खस्ता खात असल्याचे ट्विट केले होते. एका दिवसात होणारे काम दहा दिवस उलटून गेले तरी झाले नसल्याने नाराज पीटरसनने ट्विटरवरून मदतीची हाक दिली. या ट्विटमध्ये पीटरसनने परराष्ट्र मंत्रालयालाही(@MEAIndia) नमूद केले होते
Trying to travel to India urgently & the Indian Embassy has had my passport for 10days for a 24hr service. Help @MEAIndia, @IndianDiplomacy?
— Kevin Pietersen (@KP24) March 10, 2014
पीटरसनच्या ट्विटची दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने सय्यद अकबराउद्दीन यांनी संबंधित स्पर्धेबद्दल क्रीडा मंत्रालयाकडून आधी मान्यता मिळायला हवी. त्यानंतर त्वरित निर्णय घेता येईल असे म्हटले. त्यानंतर क्रीडा मंत्रालयानेही मान्यता दिल्याचे ट्विट सय्यद यांनी केले आणि ट्विटर इफेक्ट उपयोगी पडल्याबद्दल पीटरसनला शुभेच्छाही दिल्या. त्याचबरोबर लवकरच व्हिसा दिला जाईल असे आश्वासनही पीटरसनला दिले.
. @KP24 Good news. Twiplomacy works!! Necessary clearance just received from Sports Ministry. Mission to grant visa soon. C u in India soon
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Syed Akbaruddin (@MEAIndia) March 10, 2014