सावळा गोंधळ..! काही तासांतच ट्विटरनं धोनीबाबतची ‘ती’ चूक सुधारली

धोनीला भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा नायकांपैकी एक मानलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही धोनीच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही.

Twitter restores blue tick on ms dhonis account
महेंद्रसिंह धोनी आणि ट्विटर

मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंह धोनीबाबतची आपली चूक सुधारली आहे. ट्विटरने काही तासांपूर्वी धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून वेरिफाईड बॅच म्हणजे ‘ब्लू टिक’ हटवली होती. मात्र आता धोनीच्या अकाऊंटला ‘ब्लू टिक’ पुन्हा देण्यात आली आहे. धोनीला भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा नायकांपैकी एक मानले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतरही धोनीच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. तरीही त्याची ब्लू टिक हटवण्यात आली होती. धोनी सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नसतो, त्यात तो ट्विटरवर फार कमी दिसतो. ८ जानेवारीला धोनीने शेवटचे ट्वीट केले होते. अनेकवेळा तो फक्त त्याच्या इन्स्टाग्राम  अकाऊंटवर पोस्ट शेअर करतो.

देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्लू टिक’वरून जून महिन्यात बराच गोंधळ उडाला होता. ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरील ब्लू टिक (अकाऊंट विश्वसनीय असल्याचे सांगणारे निळ्या रंगाचे चिन्ह) काढून टाकली होती. मात्र, याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर ब्लू टिक पुन्हा देण्यात आली.

हेही वाचा – Tokyo 2020 : पदक हुकल्यानंतर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकानं घेतला धक्कादायक निर्णय!

‘ट्विटर’वर ‘ब्लू टिक’ला इतके महत्त्व का?

सोशल मीडियावर अनेकजण प्रसिद्ध व्यक्तींच्या नावे बनावट अकाऊंट सुरू करतात. त्यातून बऱ्याचदा खोटी माहितीही पसरवली जाते. यात व्हेरिफाईड अकाऊंट असेल, तर त्या माहितीची विश्वासार्हता वाढते. ‘ट्विटर’वर असलेल्या ट्विटर हॅण्डल व्हेरिफाईड असेल, तर त्याबद्दलची विश्वासार्हता वाढते. एखादे अकाऊंट व्हेरिफाईड हे लक्षात यावे म्हणून ट्विटरकडून ‘ब्लू टिक’ दिली जाते. यामुळे इतर वापरकर्त्यांना अमूक एका ट्विटर हॅण्डलवरून दिली जाणारी माहिती विश्वसनीय वाटते.

ट्विटरच्या नियमांनुसार एखाद्या खात्याचे नाव बदलले गेले असेल किंवा एखादे अकाऊंट सक्रिय नसेल वा अपडेट होत नसेल, तर ते अनव्हेरिफाइड केले जाते आणि ‘ब्लू टिक’ही हटवली जाते. दुसरी गोष्टी म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर ब्लू टिक असेल, मात्र नंतर त्याने कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील, तरीही ‘ब्लू टिक’ हटवली जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Twitter restores blue tick on ms dhonis account adn

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या