ब्राझीलमध्ये १२ जून ते १३ जुलैदरम्यान होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी नवी दिल्लीतील दोन मुलांची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. अदिदासचा सदिच्छादूत केव्हिन पीटरसनने ५०० मुलांमधून सेंट कोलंबा शाळेचा मिहिर बात्रा आणि मदर्स इंटरनॅशनल स्कूलचा जसेन मोसेस यांची निवड केली. आता हे दोघे साव पावलो येथे १ जुलै रोजी रंगणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी ध्वजवाहकाच्या भूमिकेत असतील.
फुटबॉलच्या महासोहळ्यासाठी या दोघांसह अन्य चार जणांची निवड याआधीच करण्यात आली आहे. हे सर्व जण बाद फेरीच्या सामन्यांसाठी ध्वजवाहक म्हणून काम पाहतील. ‘‘फुटबॉलची पंढरी असलेल्या ब्राझीलमध्ये जाऊन प्रत्यक्ष विश्वचषकाचा सामना पाहणे, हा प्रत्येक चाहत्यासाठी संस्मरणीय क्षण असणार आहे. या मुलांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे,’’ असे पीटरसनने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2014 रोजी प्रकाशित
फिफा विश्वचषकासाठी दिल्लीतील दोन मुलांची ध्वजवाहक म्हणून निवड
ब्राझीलमध्ये १२ जून ते १३ जुलैदरम्यान होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी नवी दिल्लीतील दोन मुलांची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे.
First published on: 05-05-2014 at 12:31 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two delhi kids picked to be flagbearers at fifa world cup