बांगलादेशवर ४ विकेट्स राखून विजय
सुंदर वॉशिंग्टनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर १९ वर्षांखालील भारतीय संघाने बांगलादेशवर चार विकेट्स राखून विजय साजरा केला. विजयाची हॅट्ट्रिक साजरी करत भारताने १९ वर्षांखालील तिरंगी क्रिकेट मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
बांगलादेशच्या २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋषभ पंत (५१) आणि इशान किशन (२४) यांनी ३३ चेंडूंत ६७ धावांची सलामी देत भारताला दमदार सुरुवात करून दिली. मात्र, बिनबाद ६७ वरून भारताची ४ बाद ११६ अशी अवस्था झाली. त्यानंतर सुंदर (५०) आणि अमनदीप खरे (४१) यांनी डाव सावरत भारताला ८ चेंडू आणि ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, सुंदरने दोन बळी टिपत बांगलादेशच्या फलंदाजांवर चाप बसवला होता.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : ७ बाद २२२ (सैफ हसन ३३, मेहेदी हसन मिराज ८७, मोहम्मद सैफुद्दीन ३०; सुंदर वॉशिंग्टन २-२५) पराभूत वि. भारत : ४८.४ षटकांत ६ बाद २२३ (ऋषभ पंत ५१, अमनदीप खरे ४१, सुंदर वॉशिंग्टन ५०; मेहेदी हसन मिराज २-५०).