दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कमालीची रंगत पहायला मिळते आहे. भारताने विजयासाठी दिलेलं १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशी संघाने संयमी फलंदाजी केली. सलामीवीर परवेझ हुसैन इमॉन आणि कर्णधार अकबर अलीने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत बांगलादेशचं आव्हान कायम ठेवलं.

भारताकडून रवी बिश्नोईने ४ बळी घेत बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडत सामन्यात रंगत आणली. सामन्यादरम्यान परवेझ इमॉन दुखापतीमुळे मैदानाबाहेरही गेला. मात्र संघाला गरज असताना परवेझने मैदानात येऊन पुन्हा फलंदाजी केली. ४७ धावा काढून तो माघारी परतला. यानंतर अकबर अलीने संघाला विजयाच्या जवळ आणलं. मात्र विजयासाठी १५ धावा हव्या असताना सामन्यात पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे पंचानी सामना थांबवला.

मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार, बांगलादेशने विजयासाठीचं किमान लक्ष्य पार केल्यामुळे…पावसामुळे सामना सुरु झाला नाही तर बांगलादेशला विजयी घोषित करण्यात येईल.

भारताकडून फलंदाजीत यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्माने आश्वासक कामगिरी केली.