U19 T20 World Cup Final: आयसीसी अंडर-१९ महिलांच्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये मुलीने दिलेला नवीन स्मार्टफोन वीजपुरवठा खंडित झाल्यास ऐनवेळी बंद पडू नये म्हणून भारताची गोलंदाज अष्टपैलू खेळाडू अर्चनाची आई सावित्री देवी यूपीच्या उन्नावमध्ये स्थानिकरित्या बनवलेले इन्व्हर्टर खरेदी करणार आहे. भारताच्या ज्युनियर मुलींचा टी२० विश्वचषकाचा सामना दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे इंग्लंडविरुद्ध होणार आहे. इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी त्यांच्याकडे असणार आहे. भारताच्या महिला संघासाठी हे आयसीसीचे पहिलेच विजेतेपद असेल. भारताचा महिला वरिष्ठ संघ २००५ आणि २०१७ मध्ये ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये उपविजेता होता आणि २०२० मध्ये टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला.

एकाच महिन्यात जेव्हा महिला प्रीमियर लीगचे प्रसारण हक्क ९५१ कोटी रुपयांना विकले गेले आणि कॉर्पोरेट्सनी पाच संघांच्या मालकीसाठी ४६९९ कोटी रुपये दिले, तेव्हा भारताचा विजय हा महिला क्रिकेटसाठी अभिमानाचा दिवस होता. तसेच २००७ मध्ये शिवरामसारखा पती गमावलेल्या सावित्रीच्या पालकांसाठी संस्मरणीय दिवस ठरला. रताई पुर्वा या सुमारे ४०० रहिवासी असलेल्या गावातील सावित्री द इंडियन एक्सप्रेसला सोबत बोलताना म्हणते की,“आमच्या गावात विजेची शाश्वती नाही. त्यामुळे मी इन्व्हर्टर घेण्यासाठी पैसे जमा केले आहेत. माझी मुलगी विश्वचषक फायनल खेळणार्‍या संघात आहे आणि आम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय माझ्या मोबाईल फोनवर सामना पाहण्याची आशा करतो.”

Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
sourav ganguly
पंत तंदुरुस्त, पण सिद्ध करण्यासाठी वेळ हवा – गांगुली
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

क्रिकेटच्या मैदानावर खेळायला सुरुवात करण्यापूर्वी अर्चना देवीची कहाणी फार धक्कादायक आहे. सावित्रीचे पती गेल्यानंतर सहा वर्षांपूर्वी तिने आपला धाकटा मुलगा बुद्धिमान याला साप चावल्यामुळे गमावले. त्याच वर्षी, अर्चनाला प्रशिक्षक पूनम गुप्ता आणि भारताचा पुरुष क्रिकेट फिरकीपटू कुलदीप यादव याचे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी क्रिकेटच्या दृष्टीकोनातून पुढे साथ दिली.

लेकीविषयी बोलताना सावित्री म्हणते,“मी आमच्या १ एकर शेतात काम केले आणि आमच्या मालकीच्या दोन गायींचे दूध विकून उदरनिर्वाह केला. मी अर्चनाला घरापासून दूर गंज मुरादाबाद येथील कस्तुरबा गांधी कन्या शाळेच्या वसतिगृहात राहायला पाठवल्यामुळे लोक मला टोमणे मारायचे. तिला तिथे प्रवेश मिळण्याआधी तिचे रोजचे ३० रुपये बसचे भाडेही परवडणे कठीण होते. जे लोक मला टोमणे मारायचे ते आजकाल माझे अभिनंदन करत आहेत.”

सावित्री आणि तिचा मोठा मुलगा रोहित एका खोलीच्या घरात राहतात. विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी अर्चनाने भेट दिलेल्या कुटुंबातील पहिल्या स्मार्टफोनवर ते अंतिम सामना पाहणार आहेत. मग पुन्हा, भारताच्या विजयाच्या अपेक्षेने अंतिम सामना पाहणारी सावित्री एकमेव पालक नसेल. आता १९ वर्षांची कर्णधार शफाली वर्मा ही एक विलक्षण खेळाडू आहे जिने १५ व्या वर्षी तिच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले. या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला, तिने तिच्या वडिलांच्या शब्दांतून प्रेरणा घेतली आहे. २०२० टी२० विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर तिचे वडील संजीव म्हणाले होते, “माझ्या मुलीला अधिक संधी मिळतील.”

हेही वाचा: SA vs ENG 2023: L,L,L,L,W,L,L,W,L बेन स्टोक्सनं सांगितली वन डे संघाच्या पराभवाची बाराखडी; इंग्लंड बोर्डाने संघातील जेष्ठ खेळाडूंना दिला इशारा

शफाली आपल्या बाबांविषयी बोलताना सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले की,“माझ्या वडिलांनी नेहमी असे वाटले की मी सर्वोत्तम आहे आणि माझ्याकडे सर्वकाही आहे. त्यामुळे, धन्यवाद बाबा! जे शेजारी (तिला क्रिकेट खेळण्यापासून) थांबवायला आले होते, तुम्ही त्यांना हाकलून दिले आणि मला सराव करायला लावला. जर मी उद्या ट्रॉफी जिंकली तर ती माझ्या वडिलांसाठी असेल. जर त्यांनी मला पाठिंबा दिला नसता, तर मी इथे आलो नसतो. ” फिरोजाबादपासून ५ किमी अंतरावर असलेल्या राजा का ताल येथे गुड्डी देवी यांना त्यांची मुलगी सोनम यादवने क्रिकेट खेळावे असे कधीच वाटले नाही. पण रविवारी या, सोनमच्या चार बहिणी आणि एका भावासह संपूर्ण कुटुंब त्यांच्या घरून अंतिम सामना पाहतील.

१५ वर्षीय डावखुरी फिरकीपटू सोनम भारतीय संघातील सर्वात तरुण खेळाडू आहे. तिचा भाऊ अमन यादव याने आठ वर्षांपूर्वी क्रिकेट सोडले आणि त्याचे वडील मुकेश काम करत असलेल्या काचेच्या कारखान्यात रुजू झाला. “मी १८ वर्षांचा झाल्यावर काम करायला सुरुवात केली. आमच्या बहिणींच्या लग्नासाठी आम्हाला जादा पैशांची गरज होती. सोनममध्ये लहानपणापासूनच एक ठिणगी होती. ती एक उत्तम खेळाडू होती. त्यामुळे तिने तिचे स्वप्न पूर्ण करावे अशी आमची इच्छा होती,” अमन म्हणाला.

१९ वर्षांखालील संघाने दक्षिण आफ्रिका, यूएई आणि स्कॉटलंडविरुद्धचे त्यांचे सर्व गट सामने मोठ्या फरकाने जिंकले. सुपर सिक्समध्ये मात्र त्यांना ऑस्ट्रेलियाकडून सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. संघाने श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवून पुनरागमन केले आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंडला १४.२ षटकांत आठ विकेट्स राखून १०८ धावांचे लक्ष्य गाठून पराभूत केले. दरम्यान, दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला तीन धावांनी पराभूत केले.

हेही वाचा: Women U19 World Cup: भारताच्या लेकींना आज इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! टीम इंडियाला खास गुरुमंत्र देण्यासाठी पोहोचला गोल्डन बॉय नीरज चोप्रा

भारताची पहिली महिला कर्णधार शांता रंगास्वामीचा विश्वास आहे की रविवारचा विजय देशातील महिला क्रिकेटसाठी ‘प्रेरणादायक’ ठरू शकतो. रंगास्वामी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “अंडर-१९ चा विश्वचषक आणि संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवणे हे मुख्य गोष्ट आहे. १९८३ (पुरुष विश्वचषक) विजयानंतर भारतीय क्रिकेट अधिक चांगले बदलले. उद्याचा निकाल काहीही असो, तो भारतातील महिला क्रिकेटसाठी मोठे मनोबल वाढवणारा ठरेल.”