VIDEO : ओ शेठ…! महाराष्ट्राच्या ‘अतरंगी’ अंपायरवर इंग्लंडचा मायकेल वॉनही झाला फिदा; म्हणाला, ‘‘या माणसाला…”

एक अंपायर आपल्या आगळ्यावेगळ्या कौशल्यामुळे प्रकाशझोतात आला असून त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

Umpire signals wide with legs video goes viral michael vaughan reacts
मायकेल वॉननं या अंपायरचा व्हिडिओ शेअर केला आहे.

क्रिकेटमध्ये अंपायरिंग हे खरोखरच एक कठीण काम आहे, कारण मैदानावरील पंचांना काही सेकंदात काही महत्त्वपूर्ण कॉल घेणे आवश्यक असते. पायचीतचे निर्णय आणि इतर निर्णय अचूकपणे दिले जाणे आवश्यक आहे, कारण एक चुकीचा कॉल संपूर्ण खेळावर परिणाम करू शकतो. विशेष म्हणजे, अंपायर सामान्यत: प्रकाशझोतात येतात, जेव्हा ते निर्णय घेताना चुका करतात. यावरून अंपायरिंगचे काम किती अवघड असते हे लक्षात येते. मात्र एक अंपायर आपल्या आगळ्यावेगळ्या कौशल्यामुळे प्रकाशझोतात आला आहे.

बिली बाऊडेन हे त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा वेगळ्या हावभावाद्वारे अंपायरिंग करत. मात्र आता एक अंपायर वाईडच्या निर्णयामुळे भलताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये अंपायर कधीही न पाहिलेल्या पद्धतीने निर्णय घेताना दिसत आहे.

हेही वाचा – VIDEO : दिल तो बच्चा है जी..! पावसाच्या पाण्यात बांगलादेशच्या महान क्रिकेटपटूनं केला ‘असा’ प्रकार; मैदानात धावत गेला अन्…

व्हायरल क्लिप ही पुरंदर प्रीमियर लीग या महाराष्ट्रातील स्थानिक क्रिकेट स्पर्धेची आहे, जिथे अंपायरिंगची एक अनोखी शैली पाहायला मिळाली. सामान्यतः अंपायर वाइड सिग्नल देण्यासाठी आपले हात बाजूला पसरवतात, परंतु पुरंदर प्रीमियर लीगमध्ये या अंपायरने हा सिग्नल देण्यासाठी त्याच्या पायांचा वापर केला.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनही महाराष्ट्राच्या या अंपायरवर आश्चर्यचकित झाला आहे. त्याने हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला. नक्कीच आम्हाला या माणसाला आससीसीच्या एलिट पॅनेलमध्ये सामील होताना पाहायचे आहे, असे कॅप्शन वॉनने या व्हिडिओला दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Umpire signals wide with legs video goes viral michael vaughan reacts adn

ताज्या बातम्या