Funny Cricket Video : भारतात क्रिकेटची क्रेझ खूप जास्त आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता? असा प्रश्न विचारला तर क्रिकेट सर्वात पुढे असेल. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच क्रिकेटचा आनंद घेत असतात. क्रिकेट खेळण्यासाठी मैदान किंवा स्टेडियमच हवं अशी अट मुळीच नसते. तुम्ही गल्लीत किंवा रस्त्यावरही क्रिकेट खेळू शकता. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात गल्ली, रस्ता किंवा स्टेडियममध्ये नव्हे, तर चक्क टेकडीवर क्रिकेटचा थरार सुरू आहे. या आगळ्यावेगळ्या क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काश्मिरमध्ये डोंगराळ भागात क्रिकेट खेळलं जातं. व्यवस्थित मैदान नसल्यामुळे फलंदाज डोंगरावरून फलंदाजी करतात, तर क्षेत्ररक्षक हे डोंगराच्या पायथ्याशी क्षेत्ररक्षण करण्यासाठी तैनात असतात. फलंदाजांसाठी काम सोपं असलं, तरीदेखील क्षेत्ररक्षकांसाठी हे काम मुळीच सोपं नसतं. कारण चढ उतार असलेल्या मैदानावर धावताना दमछाक होते.
टेकडीवर फलंदाजी, धाव घेण्यासाठी घसरगुंडी
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा comedy centre 0.2 या फेसबुक अकांऊटवरून शेअर करण्यात आला आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेतात क्रिकेटचा थरार सुरू आहे. शेतात मातीचा ढिगारा आहे. टेकडीवर स्टंप लावण्यात आले आहेत. तर गोलंदाज खालून वरपर्यंत चेंडू फेकताना दिसून येत आहे. फलंदाज फुल टॉस चेंडूवर स्वीप शॉट मारतो. धाव घेण्यासाठी त्याला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. फलंदाज घसरगुंडी करून खाली येतो. मात्र दुसरी धाव घेण्यासाठी त्याला चांगलीच मेहनत घ्यावी लागते. २ धावा पूर्ण करण्यासाठी एकदा तरी धावत डोंगर सर करावा लागतो. या आगळ्या वेगळ्या क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/reel/1091309436204383
व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही. या व्हिडीओचं कॅप्शन बंगाली भाषेत लिहिण्यात आलं आहे. यावरून हा व्हिडीओ बंगालचा किंवा बांगलादेशचा असल्याचं म्हटलं जात आहे . या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत ५६ हजाराहूंन अधिक लोकांनी लाईक केला आहे.