बिगरमानांकित अर्जुन कढे या पुण्याच्या खेळाडूने राष्ट्रीय खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी प्रारंभ केला. त्याने सहाव्या मानांकित लक्षित सूद याच्यावर ६-४, ६-४ असा सनसनाटी विजय मिळविला.
कढे याने उत्तर प्रदेशचा खेळाडू सूद याच्याविरुद्धच्या लढतीत दोन्ही सेट्समध्ये प्रत्येकी एकदा सव्‍‌र्हिसब्रेक मिळविला. अग्रमानांकित मोहित मयूर याने योगेश फोगाट याच्यावर ६-४, ६-२ अशी मात केली. सौरभ सिंगने अर्पित शर्मा याचे आव्हान ६-२, ६-३ असे संपुष्टात आणले. हृषभ अगरवाल याने रुबल शांडिल्य याचा ६-२, ६-१ असा दणदणीत पराभव केला.
१८ वर्षांखालील मुलांच्या गटात, अव्वल मानांकित अब्दुल्ला याला पश्चिम बंगालच्या सानील जगतानी याने कडवी लढत दिली. पण अब्दुल्लाने या सामन्यात ७-५, ६-२ असा विजय मिळवत आगेकूच केली.