संघर्षपूर्ण लढतीनंतर जोकोव्हिच उपउपांत्यपूर्व फेरीत
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा
आपल्या पहिल्यावहिल्या फ्रेंच ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिच आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी दिमाखात विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. मारिया किरलेन्कोने बेथानी मॅटेक सँड्सवर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले. याचप्रमाणे टॉमी हास आणि टॉमी रॉब्रेडो यांनी झोकात आगेकूच केली.
आधीच्या फेरीत संघर्षपूर्ण विजय मिळवावा लागणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेन्काने चौथ्या फेरीत मात्र सहज विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. अझारेन्काने फ्रान्सेस्का शियोव्हेनचा ६-३, ६-० असा धुव्वा उडवला. रशियाच्या मारिया किरलेन्कोने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सॅण्डसला ७-५, ६-४ असे नमवले.
नोव्हाक जोकोव्हिचला जर्मनीच्या फिलीप कोहलस्क्रायबर विजय मिळवताना संघर्ष करावा लागला. फिलिपने पहिला सेट जिंकत दणक्यात सलामी दिली. मात्र त्यानंतर जोकोव्हिचने शैलीदार खेळासह पुढच्या तिन्ही सेटवर कब्जा करत सामना जिंकला. जोकोव्हिचने हा सामना ४-६, ६-३, ६-४, ६-४ असा जिंकला. टॉमी हास आणि टॉमी रॉब्रेडो यांनी फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. पहिले दोन सेट गमावल्यानंतरही सलग तीन सामन्यात विजय साकारणारा रॉब्रेडो ८६ वर्षांतला पहिला टेनिसपटू ठरला आहे. रॉब्रेडोने स्पेनच्या निकोलस अल्माग्रोवर ६-७ (५), ३-६, ६-४, ६-४, ६-४ अशी मात केली.
अन्य लढतीत जर्मनीच्या टॉमी हासने रशियाच्या मिखाइल युझनीला नमवत उपउपांत्य फेरीत स्थान पटकावले. हास हा आंद्रे आगासीनंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेत अंतिम आठमध्ये धडक मारणारा पहिला पस्तिशीचा टेनिसपटू ठरला आहे. आधीच्या फेरीत जॉन इस्नरविरुद्ध विजयासाठी प्रचंड संघर्ष केलेल्या हासने युझनीवर ६-१, ६-१, ६-३ अशी सहज मात केली.

पेस-जेलेना दुसऱ्या फेरीत
भारताच्या अनुभवी लिएण्डर पेस आणि सर्बियाच्या जेलेना जॅन्कोविक जोडीने मिश्र दुहेरीत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. बिगरमानांकित पेस आणि जॅन्कोविक जोडीने गॅलिना वोसकोबोइव्हा आणि डॅनिइल ब्रासिआली जोडीवर ७-५, ६-३ अशी मात केली. पेस-जॅन्कोविक जोडीने १० पैकी ८ ब्रेक पॉइंट्स वाचवले आणि हेच त्यांच्या विजयात निर्णायक ठरले. पुढच्या फेरीत पेस-जॅन्कोविक जोडीची लिझेल ह्य़ुबेर (अमेरिका) आणि मार्सिलो मेलो (ब्राझिल) जोडीशी लढत होणार आहे. मिश्र दुहेरीत पेस हा भारताचा एकमेव प्रतिनिधी आहे. सानिया मिर्झा, महेश भूपती तसेच रोहन बोपण्णा या तिघांनाही आपापल्या साथीदारांसह खेळताना मिश्र दुहेरी प्रकारात पराभवाला सामोरे जावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गतविजेत्या सायना नेहवालला थायलंड ग्रां. प्रि.बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची खात्री वाटत असून, अजय जयराम व सौरभ वर्मा यांच्यावरही भारताची भिस्त आहे. या स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे.
दुखापतीमुळे सुदीरमन चषक स्पर्धेत सायनाला भाग घेता आला नव्हता.