Jasprit Bumrah clean bowled Ollie Pope on a brilliant yorker : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या शानदार गोलंदाजीने चाहत्यांना खूश केले. जादुई स्पेल करताना, बुमराहने प्रथम इंग्लंडचा विश्वासू खेळाडू जो रूटला बाद केले. त्यानंतर पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या ऑली पोपला यॉर्कर चेंडूवर क्लीन बोल्ड केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्ंहायरल होत आहे.

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १९६ धावांची संस्मरणीय खेळी करणारा ओली पोप या सामन्यातही फॉर्ममध्ये दिसत होता. तो पुन्हा एकदा मोठी खेळी खेळेल असे वाटत होते, पण २८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने त्याचा अडसर दूर केला. बुमराहने त्याला असा चेंडू टाकला, जो पोपला समजला नाही आणि तो क्वीन बोल्ड झाला. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई

अशाप्रकारे क्लीन बोल्ड झाल्यानंतर पोपचा विश्वास बसत नव्हता की त्याच्याबरोबर काय झाले? त्याचवेळी भारतीय संघाचे सेलिब्रेशनही पाहण्यासारखे होते. बुमराहच्या या शानदार चेंडूचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या इंग्लंडच्या आशा कर्णधार बेन स्टोक्सवर आहेत. जर भारताने या त्याला लवकर बाद केले, तर भारत या कसोटीत आपली पकड मजबूत करेल. इंग्लंडने ४० षटकानंतर ६ बाद १७८ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – IND vs ENG : आधी अंपायरशी नंतर अँडरसनशी अश्विनचा झाला वाद, जाणून घ्या काय होते कारण?

भारताच्या पहिल्या डावाबद्दल बोलायचे, तर २२ वर्षीय यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावून भारताला या कसोटीत इंग्लंडपेक्षा पुढे केले. यशस्वीने २९० चेंडूत २०९ धावा करत अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले. यशस्वीच्या खेळीमुळेच भारताला ३९६ धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. कारण यशस्वीची खेळी नसती, तर कदाचित भारत ३०० धावांपर्यंत पोहोचू शकला नसता. कारण त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकही झळकावता आले नाही.