बिश्केक (किर्गिस्तान)

ऑलिम्पिक स्पर्धेतील कुस्ती क्रीडा प्रकारात सहभागाचा महिलांचा टक्का पॅरिसमध्ये वाढला. आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीतून अनुभवी विनेश फोगट (५० किलो), अंशु मलिक (५७ किलो), रितिका (७६ किलो) यांनी ऑलिम्पिक कोटा मिळवला. या यशाने भारताने पॅरिस ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत चार ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवले असून, चारही महिला गटातील आहेत. अंतिम पंघाल (५३ किलो) यापूर्वीच जागतिक स्पर्धेतून पात्र ठरली आहे. मानसी (६२ किलो), निशा (६८ किलो) यांना ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यापासून वंचित राहावे लागले. आता यांना पुढील महिन्यात जागतिक ऑलिम्पिक पात्रता फेरीत अखेरची संधी मिळेल.

pv sindhu
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; अश्मिताचा तिसऱ्या मानांकित झँगला धक्का
vinesh fogat
ऑलिम्पिक कोटा विजेत्या कुस्तीगिरांना निवड चाचणीपासून सूट; मानांकन स्पर्धा, शिबिरातून तंदुरुस्तीचा आढावा घेण्याचा निर्णय
India Olympic and World Championships gold medalist javelin thrower Neeraj Chopra fails in Doha Diamond League
नीरजला जेतेपदाची हुलकावणी; दोहा डायमंड लीगमध्ये विजेत्यापेक्षा केवळ दोन सेंटीमीटरने मागे
nisha dahiya succeeded in securing the fifth olympic quota for the country in womens wrestlingr
कुस्तीपटू निशा दहियाची ऐतिहासिक कामगिरी; भारतासाठी जिंकला ऑलिम्पिकचा पाचवा कोटा
aman sehravat
भारतीय मल्लांचे कौशल्य पणाला; अखेरची ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा आजपासून
Indian Relay Teams Qualify for Olympics
रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ; जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेदरम्यान भारताच्या महिला, पुरुष संघांना यश
ICC Annual Team Rankings Announced
वनडे आणि ट्वेन्टी२० प्रकारात टीम इंडिया अव्वल; आयसीसीची वार्षिक क्रमवारी जाहीर
Indian Team Announced for World Cup 2024
T20 World Cup 2024 : साई-अभिषेकसह IPL 2024 गाजवणाऱ्या ‘या’ पाच खेळाडूंना वर्ल्डकपसाठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान

आतापर्यंत गीता फोगट (२०१२, लंडन), साक्षी मलिक (२०१६ रिओ), विनेश फोगट (२०१६ रिओ, ४८ किलो), २०२० टोक्यो (५३ किलो), अंशु मलिक, सोनम मलिक (२०२०, टोक्यो) या पाच महिला कुस्तीगिरांनीच यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. यात साक्षी भारताची पहिली महिला ऑलिम्पिक पदकविजेती मल्ल आहे. विनेशची कामगिरी लक्षवेधक ठरली. वर्षभरातील अनेक वादग्रस्त प्रसंगातून बाहेर पडत विनेशने तिसऱ्यांदा ऑलिम्पिक पात्रता सिद्ध केली. रिओत गुडघ्याच्या दुखापतीने विनेशच्या कामगिरीवर मर्यादा आल्या, तर टोक्योत उपांत्यपूर्व फेरीत विनेशला बेलारुसच्या वानेसा कलाझिंस्कायाकडून पराभव पत्करावा लागला. वानेसा उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे विनेशची रेपिचेजचीही संधी हुकली.

हेही वाचा >>> IPL 2024: हैदराबादचा धावांचा महापूर पुन्हा एकदा सुफळ संपूर्ण, दिल्लीच्या फलंदाजांची झुंज अपयशी

विनेशने ५० किलो वजन गटातून पहिल्याच लढतीत कोरियाच्या मिरन चेऑनला तांत्रिक आघाडीवर पराभूत केले. विनेशने अवघ्या १ मिनिट ३९ सेकंदात लढत जिंकली. विनेशच्या चपळ आणि वेगवान हालचालींसमोर एकाही प्रतिस्पर्धीकडे उत्तर नव्हते. दुसरी लढत तर विनेशने ६७ सेकंदात जिंकली. विनेशने कंबोडियाच्या समानांग डिटला पराभूत केले. नंतर निर्णायक उपांत्य फेरीतही विनेशने कझाकस्तानच्या लॉरा गॅनिकिझीला तांत्रिक आघाडीवर मात देत ऑलिम्पिक प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेती अंशु मलिकला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला. उपांत्यपूर्व फेरीत तिने किर्गिस्तानच्या कलमिरा बिलिम्बोकोवावर तांत्रिक आघाडीवर सहज मात केली. उपांत्य फेरीतही अंशुला फारसा प्रतिकार झाला नाही. अंशुने २ मिनिटांत उझबेकिस्तानच्या लेलोखॉन सोबिरोवावर ११-० असा तांत्रिक विजय मिळवला.

त्यानंतर रितिकाने ७६ किलो वजनी गटातून अशाच एकतर्फी वर्चस्वासह उपांत्य फेरी गाठली होती. रितिका २३ वर्षांखालील जागतिक गटातील सुवर्णपदक विजेती आहे. पहिल्या फेरीत रितिकाने एयुंजु वांगवर तांत्रिक आघाडीने विजय मिळवला. पाठोपाठ मंगोलियाच्या दवाननासन एंख अमरला रितिकाने असेच एकतर्फी हरवले. उपांत्यपूर्व फेरीत मात्र रितिकाला चीनच्या जुआंग वॅंगने कडवे आव्हान दिले. रितिका ८-० अशी आघाडीवर असताना जुआंगने पाठोपाठ ६ गुणांची कमाई करताना रितिकावरील दडपण वाढवले. अखेरच्या मिनिटालादेखील जुआंगचा डाव अप्रतिम पडला. मात्र, तोवर वेळ संपल्यामुळे नशिबाने विजय रितिकाच्या पारडयात पडला होता. उपांत्य फेरीत रितिकाने संयमाने कुस्ती करताना चायनीज तैपेइच्या हुई टी चँगचा ८-० असा पराभव करून ऑलिम्पिक पात्रता मिळवली.

मानसी अहलावतला ६२ किलो वजनी गटातून उपांत्य फेरी गाठण्यासाठी एकाच विजयाची आवश्यकता होती. तिने कझाकस्तानच्या इरिना कुझ्नेट्सोवाला ६-४ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत मानसीला कोरियाच्या योन जी मुनचे आव्हान पेलता आले नाही. योनने गुणांवर मानसीचा ६-० असा पराभव केला.भारताची केवळ निशा दहिया ६८ किलो वजनी गटातून पात्रता सिद्ध करू शकली नाही.

अडथळयाच्या शर्यतीतून..

गेले वर्ष भारतीय कुस्तीसाठी जसे वादग्रस्त ठरले, तितकेच ते वादाला वाचा फोडणाऱ्या विनेश फोगटसाठी देखिल अडथळयाचे ठरले. विनेशने वर्षांची सुरुवात भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या हुकुशाही कारभाराला वाचा फोडून केली. अनेक चढ उतारानंतर विनेशची ही लढाई अजून सुरुच आहे. त्यात वैयक्तिक तंदुरुस्ती आणि कुस्तीकडे दुर्लक्ष व्हायला लागले. १७ ऑगस्ट रोजी गुडघ्यावरील शस्त्रक्रीयेनंतर ती मॅटवर देखिल उतरली नाही. उतरली ती थेट ऑलिम्पिक निवड चाचणीत. या वेळी देखील विनेशला आपला नेहमीचा ५३ वजनी गट सोडावा लागला. तिने जिद्दीने ५० किलो वजनगटाची निवड केली आणि ऑलिम्पिक कोटा मिळवून स्वत:ला सिद्ध केले. विनेश तिसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. आता अंतिम संघ निवडताना कुठल्याही राजकारणाशिवाय तिची संघात निवड व्हावी हीच अपेक्षा आहे.

महिलांचे यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे. गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांनी मिळवलेल्या यशामुळे देशातील महिला कुस्ती प्रगतिपथावर होती आणि हे यश त्याचेच फलित आहे. मुख्य म्हणजे हरियाणाखेरीज अन्य राज्यातही मुली कुस्ती खेळू लागल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढली आणि अनेक मुली पुढे आल्या. पुरुष विभागात निसर्गाची अवकृपा झाली नसती, तर दीपक पूनियादेखिल ऑलिम्पिक पात्रता सिद्ध करू शकला असता.

– दिनेश गुंड, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच

रितिका हुडा

* आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत

 १ कांस्य

* २३ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत १ सुवर्ण

*  पदार्पणातील यशाला ऑलिम्पिक पात्रतेची जोड

अंशु मलिक 

* जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत

१ रौप्य

* राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत

१ रौप्य

*  विश्वचषक स्पर्धेत १ रौप्य

विनेश फोगट 

* जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तीन कांस्यपदके

* आशियाई क्रीडा स्पर्धेत १ सुवर्ण, १ कांस्य * राष्ट्रकुल स्पर्धेत ३ सुवर्ण