विक्रमी खेळीसह सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला ऑल आऊट करत ६७ धावांनी विजय मोठा विजय मिळवला आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माच्या पॉवरप्लेमधील सर्वाधिक १२५ धावांच्या खेळीसह एसआरएचने २६७ धावांचा डोंगर उभारला. दिल्लीच्या फलंदाजांनीही हे लक्ष्य गाठण्याचा खूप प्रयत्न केला पण ठराविक अंतराने गमावलेल्या विकेट्समुळे संघाला या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्यात अयशस्वी ठरले. दिल्लीकडून जेक फ्रेझर मॅकगर्कने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले, पण ६८ धावा करत तो बाद झाला. हैदराबादचा आयपीएलमधील हा सलग चौथा विजय असून तिन्ही वेळेस त्यांनी २०० अधिक धावांचा डोंगर उभारला आहे.

दिल्लीचे सलामीवीर स्वस्तात बाद झाल्याने दिल्लीची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. पण पृथ्वी शॉने पहिल्या षटकातील सुरूवातीच्या ४ चेंडूवर सलग चार चौकार लगावत वादळी सुरूवात केली खरी पण संघ तो १६ धावा करत बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर १ धाव करत बाद झाला. त्यानंतर आलेल्या फ्रेझर मॅकगर्कने संघाचा डाव उचलून धरला आणि त्याला अभिषेक पोरेलने चांगली साथ दिली. फ्रेझर मॅकगर्कने १८ चेंडूत ७ षटकार आणि ५ चौकारांसह ६५ धावांची धुव्वाधार खेळी केली. तर अभिषेक पोरेलने २२ चेंडूच १ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ट्रिस्टन स्टब्सला आपल्या खेळीने छाप पाडता आला नाही आणि एकही बाऊंड्री न लगावता तो १० धावा करत बाद झाला,

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
IPL 2024 Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: दिल्लीच्या फ्रेझर मॅकगर्कने झळकावले आयपीएल २०२४ मधील सर्वात जलद अर्धशतक, हेड-अभिषेकही पडले मागे
DC beat RR by 20 Runs sanju samson wicket Controversy
IPL 2024: संजू सॅमसनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त; राजस्थान पराभूत, प्लेऑफ प्रवेश लांबणीवर
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
sunrisers hyderabad
SRH vs LSG: हरली लखनौ, पण आव्हान संपलं मुंबईचं; सनरायझर्सनं अवघ्या पाऊण तासात सामना घातला खिशात!
MI beat SRH by 7 Wickets With Suryakumar Yadav Superb Century
IPL 2024: सूर्यकुमार यादवचे झंझावाती शतक हैदराबादवर पडलं भारी, मुंबई इंडियन्सने व्याजासकट घेतला बदला
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Hardik Pandya Statement on MI defeat to KKR
IPL 2024: “आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही…” मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार पंड्या नेमकं काय म्हणाला?

कर्णधार ऋषभ पंत ३५ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह ४४ धावा करत बाद झाला. तर ललित यादव ७, अक्षर पटेल ६ आणि पुढील दोन फलंदाज खातेही न उघडता नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाले आणि अशारितीने दिल्लीचा संघ केवळ १९९ धावा करत ऑल आऊट झाला. हैदराबादकडून नटराजने ४ षटकात १९ धावा देत ४ विकेट्स घेतले. तर नितीश रेड्डी आणि मयंक मार्कंडेय यांनी प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या. तर सुंदर आणि भुवनेश्वरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

नाणेफेक गमावत हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि त्यांनी २६७ धावांची विक्रमी खेळी केली. हैदराबाद फलंदाजी करताना जणू गोलंदाजांची धुलाई करण्याच्या उद्देशानेच उतरलेत की काय असं वाटतं होतं. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने अवघ्या २.५ षटकांत ५० धावांचा आकडा गाठला. धुव्वाधार फलंदाजी करत या दोघांनी पॉवरप्लेमध्ये टी-२० मधील १२५ धावांची सर्वात मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर कुलदीप यादवने दिल्लीला सामन्यात परत आणत एकाच षटकात २ विकेट्स घेतल्या. पहिलं त्याने अभिषेक शर्माला अक्षरकडून झेलबाद केलं ज्याने त्याचा एक जबरदस्त झेल टिपला तर त्याच षटकात मारक्रमला अक्षर पटेलकडून झेलबाद केले. यानंतर त्यांच्या धावांना थोडा ब्रेक लागला, पण हेड मैदानात कायम होता.

कुलदीपने हेडला पुढच्याच षटकात ट्रिस्टन स्टब्सकडून झेलबाद केले, ज्याने ३२ चेंडूत ६ षटकार आणि ११ चौकारांची तुफानी खेळी केली. स्टब्सने एक उत्कृष्ट झेल टिपत त्याला माघारी धाडले. त्यानंतर क्लासेन १५ धावा करत अक्षरकडून क्लीन बोल्ड झाला. तर नितीश रेड्डी आणि शाहबाज अहमदने संघाची धावसंख्या २६७ पर्यंत पोहोचवली. नितीश ३७ धावा करून बाद झाला तर शाहबाज अहमदने २९ चेंडूत ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद ५९ धावा केल्या. तर अब्दुल समदनेही १३ धावांचे योगदान दिले.

दिल्लीकडून कुलदीप यादवने ४ षटकात ५५ धावा देत ४ विकेट्स घेतले तर मुकेश कुमार आणि अक्षरने प्रत्येकी एक विकेट मिळवली.