Indian Wrestler Vinesh Phogat Announces Pregnancy: भारतीय कुस्तीपटू आणि जुलाना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार विनेश फोगटने गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट करून ती आई होणार असल्याची माहिती सर्वांसह शेअर केली. लग्नाच्या ७ वर्षांनंतर विनेश फोगट आई होणार आहे. विनेश फोगटचे सासरे राजपाल राठी यांनी याला दुजोरा दिला आणि सांगितले की, त्यांच्या घरी लहान पाहुण्याच्या रूपात आनंद येणार आहे. इतर भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी कमेंट करत विनेश आणि सोमवीर राठी यांचं अभिनंदन केलं.

३१ वर्षीय विनेश फोगटने पती सोमवीर राठीसह इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना ही माहिती दिली. विनेश आणि सोमवीर यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “एका नवीन अध्यायासह आमची प्रेमकथा पुढे जात आहे.” या पोस्टवरून विनेश आई होणार असल्याचे स्पष्ट झाले.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील प्रकरणानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर विनेशने राजकारणात प्रवेश केला. तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि २०२४ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून विजय मिळवला.

विनेशने २०१८ साली तिचा जोडीदार सोमवीर राठीबरोबर लग्न केले, सोमवीर पेशाने कुस्तीपटू देखील आहे. हिंदू रितीरिवाजानुसार लग्नात ७ फेरे घेतले जातात, पण विनेश आणि सोमवीरने ८ फेरे घेतले. त्यांनी घेतलेली आठवी फेरी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी खिलाओ’ या शपथेसाठी होती, त्यामुळे त्यांचे लग्न अगदी वेगळे होते.

View this post on Instagram

A post shared by Vinesh Phogat (@vineshphogat)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून अपात्र ठरवण्यात आले कारण अंतिम सामन्यापूर्वी तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. ऑलिम्पिक संपल्यानंतर विनेश भारतात परतली पण त्यादरम्यानच तिने कुस्तीमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर आता विनेश काँग्रेस पक्षाची आमदार आहे. दरम्यान विनेशने कुस्तीत पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते, मात्र तिने याबाबत नंतर काहीच माहिती दिली नाही.