Virat Kohli Bought Villa: क्रिकेटपटू विराट कोहलीने नुकताच अलिबागमधील आवास गावात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. विराट कोहली सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत त्यांचा मोठा भाऊ विकास कोहली याने अलिबागमध्ये बंगला खरेदी करण्याची सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे.

विराट आणि अनुष्काची अलिबागमधील पहिली मालमत्ता नाही. या जोडप्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबागमध्ये १९.२४ कोटी रुपयांना फार्महाऊस खरेदी केले होते. त्याने १.१५ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याची माहिती आहे.

IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: बुमराह वि कोहलीमध्ये जसप्रीतने मारली बाजी, आयपीएलमध्ये पाचव्यांदा केलं विराटला आऊट, पाहा VIDEO
Yuzvendra Chahal become third highest wicket taker for Rajasthan Royals
IPL 2024 : युजवेंद्र चहलने मोडला शेन वॉर्नचा विक्रम, राजस्थानसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला तिसरा गोलंदाज
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Virat Avesh video share from RR
RR vs RCB : ‘आजा-आजा… ऐसा मौका फिर कहा मिलेगा…’, विराट कोहलीने आवेश खानची घेतली फिरकी; पाहा VIDEO

हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीने आवास व्हिलेजमधील २,००० चौरस फुटाच्या व्हिलावर ६ कोटी रुपये खर्च केले आहेत. या मालमत्तेवर त्यांनी ३६ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. या व्हिलामध्ये ४०० स्क्वेअर फूटचा स्विमिंग पूलही असल्याचं सांगण्यात येत आहे. बॉलीवूड अभिनेता संजय खानची मुलगी आणि हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खान हिने या प्रकल्पाचे इंटीरियर डिझाइन केले आहे.

वकील महेश म्हात्रे हे आवास लिव्हिंग अलिबाग एलएलपीचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात. त्यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “आवास हे नैसर्गिक सौंदर्यामुळे सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. तसेच, मांडवा जेटी आवासपासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे आणि स्पीड बोटींनी मुंबईचे अंतर आता फक्त १५ मिनिटांवर आणले आहे.

अहवालानुसार, “अलिबागमधील जमिनीच्या सरासरी किमती सुमारे ३,००० ते ३,५०० रुपये प्रति चौरस फूट आहेत. हे उच्चभ्रू वर्गासाठी एक आवडते वीकेंड डेस्टिनेशन देखील आहे.” फक्त विराट कोहलीच नाही तर भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मानेही अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. रोहित शर्माने २०२१ मध्ये म्हात्रोली गावात चार एकर जमीन खरेदी केली होती.

हेही वाचा – KCC T20 Championship 2023: अभिनेता किच्चा सुदीप क्रिकेटच्या दिग्गजांसोबत पार्टी करताना दिसला, पाहा फोटो

विशेष म्हणजे विराट कोहली क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी जगभरात ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. त्याचबरोबर कोहलीची गणना जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. कोहलीकडे प्रॉपर्टी व्यतिरिक्त अनेक महागड्या कार देखील आहेत.