scorecardresearch

विराट कोहलीने कर्णधारासारखी वागणूक ठेवावी- मोहम्मद अझरुद्दीन

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांनी विराट कोहलीने स्टेडियमवर कर्णधारासारखी वागणूक ठेवावी असे म्हटले आहे.

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांनी विराट कोहलीने स्टेडियमवर कर्णधारासारखी वागणूक ठेवावी असे म्हटले आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार कोहलीने बाद झाल्याच्या दिलेल्या निर्णयावरून पंचांवर नाराजी व्यक्त केली होती. सामना भारताने जिंकला होता. परंतु, विराट कोहलीच्या यावागणूकीवर मोहम्मद अझरुद्दीन नाराज झाले. ते म्हणाले, कोहलीकडे संपुर्ण भारतीय क्रिकेटरसिक भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार म्हणून बघतात त्यामुळे या युवा खेळाडूने स्टेडियमवर कर्णधारासारखी वागणूक ठेवली पाहीजे. कोहली उत्तम खेळाडू आहे यात काही शंका नाही परंतु, प्रत्येकवेळी स्वभावात आक्रमकपणा ठेवून चालत नाही. असेही अझरुद्दीन म्हणाले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virat kohli has to behave like a captain says mohammad azharuddin

ताज्या बातम्या