भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा देशातील आणि जगातील सर्वात उत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोइंग चांगली आहे. विराटने सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले तर चाहते त्यावर अनेक प्रतिक्रिया देतात. विराटने आता इन्स्टाग्रामवर एक खास फोटो पोस्ट करत आईला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहलीने त्याच्या आईसोबत गुरुद्वाराचा एक फोटो शेअर केला आहे. ‘हॅपी बर्थडे माँ’, असे त्याने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. विराट आणि त्याच्या आईचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. यासोबतच सेलिब्रिटी आणि चाहतेही विराटच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

मैदानाबाहेर विराट त्याच्या मृदू स्वभावासाठी ओळखला जातो. विराटच्या संगोपनात त्याची आई सरोज यांचा मोलाचा वाटा आहे. २००६ मध्ये विराटच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर सरोज यांनी विराटसह विकास आणि मुलगी भावना यांना लहानाचे मोठे केले.

हेही वाचा – शिस्त म्हणजे शिस्तच..! ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नंबर १ खेळाडू जोकोविचला शिकवला धडा; व्हिसा रद्द केला आणि…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट त्याच्या यशाचे श्रेय त्याची आई सरोज कोहली आणि वडील प्रेम कोहली यांना देतो. आईसोबतचे अनमोल क्षणही तो शेअर करतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत तो फिटनेसच्या समस्येमुळे खेळू शकला नाही. पाठीच्या दुखण्यामुळे तो या सामन्यातून बाहेर पडला आहे.

असे असले, तरी तो बुधवारी राहुल द्रविडसोबत सराव करताना दिसला. ११ जानेवारीपासून केपटाऊन येथे होणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत तो खेळणार असल्याचे मानले जात आहे. गेल्या ३ वर्षांपासून त्याचा फॉर्म चांगला नाही. २०१९ मध्ये शेवटचे शतक झळकावल्यानंतर तो तिहेरी धावा जमवण्यात अपयशी ठरला आहे.