भारतीय संघाचा सध्याचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली त्याच्या चाहत्यांना खुश करण्यासाठी नेहमी सज्ज असतो. विराटचा संपूर्ण जगभरात भरपूर मोठा चाहता वर्ग आहे. ऑस्ट्रेलिया दौऱयात देखील स्टेडियमवर विराटच्याच नावाचा बोलबाला दिसला. एखाद्या चाहत्याने केलेली इच्छा विराट नक्की पूर्ण करतो, अशी देखील एक त्याची वेगळी ओळख आहे आणि ती ऑस्ट्रेलियात पाहायला मिळाली. वाका स्टेडियमवर उफस्थित चाहत्यांनी विराटकडे सेल्फी घेण्याची विनंती केली. मग विराटनेही चाहत्यांचे मन राखले. विराटने चाहत्यांचे मोबाईल घेऊन त्यांच्यासोबत सेल्फी टिपून दिले. विराटच्या या सेल्फी गिफ्टने ऑस्ट्रेलियातील त्याच्या चाहत्यांना आनंद झाला.