बीसीसीआयच्या निवड समितीने घातलेल्या घोळामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आणखी एका सामन्याला मुकावं लागणार आहे. सरे क्रिकेट क्लबकडून काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी विराट इंग्लंडला रवाना होत असल्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात विराट खेळू शकणार नाहीये. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. मात्र यानंतर आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन टी-२० सामन्यांपैकी एका टी-२० सामन्यालाही विराटला मुकावं लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ ते २८ जूनरोजी विराट कोहलीचा सरे संघ यॉर्कशायर संघाविरुद्ध ४ दिवसांचा सामना खेळणार आहे. यामुळे २७ जूनरोजी होणाऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचं नेतृत्व करु शकणार नाहीये. सरे क्रिकेट क्लबच्या संपर्क प्रमुखांनी इंडिया टुडे या वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिलेली आहे. भारतीय संघ २७ आणि २९ जूनरोजी आयर्लंडविरुद्ध टी-२० सामने खेळणार आहे.

अवश्य वाचा – काउंटी क्रिकेट की भारतीय संघ?? निवड समितीच्या घोळामुळे विराट कोहली पडला पेचात

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli to miss first t20i against ireland
First published on: 09-05-2018 at 20:59 IST