IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ च्या गट टप्प्यातील दोन सामने जिंकून भारताने सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. ४ सप्टेंबर रोजी भारतीय संघाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या अटीतटीच्या सामन्याच्या आधी भारताचा महत्त्वाचा फलंदाज खास अंदाजात सराव करताना दिसला. विराट कोहली एक महिन्याच्या ब्रेकनंतर आशिया कपमध्ये वापसी करत आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याने निवड समितीकडे विश्रांतीची मागणी केली होती.

आशिया कपमध्ये पुनरागमन केल्यानंतर, कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, तर हाँगकाँगविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावले. ४ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी विराटचा ‘हाय अल्टीट्यूड मास्क’ घालून धावतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा मास्क फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यास आणि ती सुधारण्यास मदत करतो. तसंच त्यामुळे स्टॅमिना सुधारतो. यूएईच्या कडक उन्हात हे प्रशिक्षण कोहलीला मैदानावरील इतर खेळाडूंच्या तुलनेत ताजेतवाने ठेवण्यास मदत करेल. विराट कोहलीने त्याचे नेट सेशन संपवून हा सर्व केला. व्हिडीओमध्ये तो सपोर्ट स्टाफच्या देखरेखीखाली हे ट्रेनिंग करताना दिसत आहे. या दरम्यान तो स्वतःच्या वेळेकडे स्वतः लक्ष देत आहे.

गच्च भरलेल्या बसमध्ये विद्यार्थ्याला गेटवर लटकून करावा लागत होता प्रवास, अचानक हात सुटला आणि…; पाहा धक्कादायक VIDEO

सुपर ४ मध्ये भारताचा पहिला सामना ४ सप्टेंबरला पाकिस्तानशी, त्यानंतर ६ सप्टेंबरला श्रीलंका आणि ८ सप्टेंबरला अफगाणिस्तानशी होणार आहे. भारताने तीनपैकी दोन सामने जिंकले तर अंतिम फेरी गाठण्याची शक्यता जास्त आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.