scorecardresearch

Premium

Virender Sehwag : १२ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सेहवागने केला होता मोठा पराक्रम; वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती वादळी खेळी

IND vs WI Match Updates : वीरेंद्र सेहवागने इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केवळ १४१ चेंडूत २१९ धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत ४५ चौकार आणि ७ षटकार मारले. तसेच भारताने या सामन्यात १५३ धावांनी विजय नोंदवला होता.

Virender Sehwag became the second player to score an ODI double century
वीरेंद्र सेहवागचे द्विशतक (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Virender Sehwag Double Century Against WI : वीरेंद्र सेहवागची गणना जगातील सर्वात दमदार सलामीवीरांमध्ये केली जाते. तो केवळ एकदिवसीयच नाही तर कसोटी क्रिकेटमध्येही टी-२० फॉरमॅटप्रमाणे फलंदाजी करत असे. सेहवागने आपल्या कारकिर्दीत टीम इंडियासाठी अनेक वादळी इनिंग खेळल्या. मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्धची ३०९ धावांची खेळी कोणीही विसरू शकणार नाही. या खेळीमुळे सेहवागला ‘मुलतानचा सुलतान’ म्हटले जाऊ लागले. मात्र १२ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी त्याने द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला होता. सचिननंतर हा पराक्रम करणारा दुसरा खेळाडू ठरला होता.

८ डिसेंबर हा दिवस वीरेंद्र सेहवागसाठी खूप खास आहे. १२ वर्षांपूर्वी याच दिवशी सेहवागने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर इतिहास रचला होता. सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात २१९ धावा केल्या होत्या. त्यावेळी सेहवाग कर्णधार म्हणून वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर ६ वर्षांनी भारताच्या रोहित शर्मानेही ही कामगिरी केली. तो द्विशतक झळकावणारा भारतचा तिसरा खेळाडू ठरला. त्याने २०८ नाबाद धावा केल्या होत्या. रोहितने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध हा विक्रम केला होता.

Pope and Bumrah Controversy in Ind vs ENG 1st Test Match
IND vs ENG : जसप्रीत बुमराहने ऑली पोपशी मुद्दाम पंगा घेतल्याने रोहितला करावी लागली मध्यस्थी, VIDEO होतोय व्हायरल
India Vs England First Test Match Updates in marathi
IND vs ENG : १२ वर्षांनंतर भारतात विदेशी संघाने केला मोठा पराक्रम, ओली पोपच्या नावावरही झाली खास विक्रमाची नोंद
Joe Root broke Ricky Pontig's record with two runs in second innings
IND vs ENG 1st Test : जो रुटने अवघ्या दोन धावा करत रचला इतिहास, भारताविरुद्ध केला सर्वात मोठा विक्रम
IND vs ENG 1st Test Match Updates
IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध भारताने पहिल्या डावाच्या जोरावर घेतली १९० धावांची आघाडी, राहुलनंतर जडेजाचेही हुकले शतक

आजपासून बरोबर १२ वर्षांपूर्वी म्हणजे ८ डिसेंबर २०११ रोजी वीरेंद्र सेहवागने तुफानी इनिंग खेळली होती. वीरेंद्र सेहवागने अवघ्या १४१ चेंडूत २१९ धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत २३ चौकार आणि ७ षटकार मारले होते. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ५० षटकांत ५ बाद ४१८ धावा केल्या. वीरेंद्र सेहवागने वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग वनडे फॉरमॅटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा दुसरा फलंदाज होता. कारण हा पराक्रम करणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर आहे.

हेही वाचा – AUS vs PAK Test Series: मिचेल जॉन्सनच्या टीकेला डेव्हिड वॉर्नरचे प्रत्युत्तर; म्हणाला, “माझ्या आई-वडिलांनी मला…”

टीम इंडियाने उभारला होता ४१८ धावांचा मोठा डोंगर –

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर वीरेंद्र सेहवागच्या द्विशतकाशिवाय गौतम गंभीर आणि सुरेश रैनाने पन्नास धावांचा टप्पा पार केला. गौतम गंभीरने ६७ चेंडूत ६७ धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार मारले. तर सुरेश रैनाने ४४ चेंडूत ५५ धावा केल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने अनुक्रमे २७ आणि २३ धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसाठी हा सामना चांगला नव्हता. वेस्ट इंडिजचे गोलंदाज चांगलेच महागडे ठरले होते. वेस्ट इंडिजकडून केमार रोचशिवाय आंद्रे रसेल आणि किरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली होती.

हेही वाचा – LLC 2023 : गौतम गंभीरवर टीका करणे श्रीसंतला पडले महागात, एलएलसी आयुक्तांनी बजावली कायदेशीर नोटीस

भारताच्या ४१८ धावांना प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा डाव ४९.२ षटकांत २६५ धावांवर आटोपला. अशा प्रकारे भारतीय संघाने १५३ धावांनी मोठा विजय नोंदवला. या सामन्यात विंडीजकडून यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिनने ९६ चेंडूत सर्वाधिक ९६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार मारले. पण याशिवाय एकाही कॅरेबियन फलंदाजाला पन्नास धावांचा आकडा पार करता आला नाही. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजा आणि राहुल शर्मा यांनी सर्वाधिक ३-३ विकेट्स घेतल्या. याशिवाय सुरेश रैनाने २ विकेट्स घेतल्या, तर रवी अश्विनला १ विकेट मिळाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virender sehwag became the second player to score an odi double century twelve years ago today against wi vbm

First published on: 08-12-2023 at 14:41 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×