Virender Sehwag wrote, ‘If you do miracles, if we do, the pitch is useless : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दुसऱ्या दिवशीच ७ विकेट्सनी विजय मिळवला. संपूर्ण सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांनी शानदार गोलंदाजी केली. या मैदानावर भारताचा हा पहिला कसोटी विजय होता आणि टीम इंडियाने ३१ वर्षांनंतर येथे विजय मिळवला आहे. हा सामना दीड दिवसात संपला आणि यानंतर खेळपट्टीवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले. आता वीरेंद्र सेहवागने खेळपट्टीबद्दल दिलेली प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहे.

सामना संपल्यानंतर दोनच दिवसांत वीरेंद्र सेहवागने एक्सवर एक पोस्ट केली. त्याची ही पोस्ट खूपच छान आहे. याद्वारे त्याने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेसह सर्व सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांवर सडकून टीका केली. त्याचबरोबर या देशांच्या खेळपट्टीवर त्याने प्रश्नही उपस्थित केले. भारताच्या फिरकी खेळपट्ट्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. आता वीरेंद्र सेहवागने एक पोस्ट करत सर्वांवर निशाणा साधला.

Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024
IPL 2024 : अक्षर पटेलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’च्या नियमावर उपस्थित केला प्रश्न, सांगितले ‘या’ खेळाडूंसाठी का आहे धोकायदायक?
Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
Andre Russell Closed His Ears as fans cheer when ms dhoni came to bat
IPL 2024: धोनीची एंट्री होताच जल्लोष टिपेला; आंद्रे रसेलने ठेवले कानावर हात- व्हीडिओ व्हायरल

‘तुम्ही केला तर चमत्कार …’ –

वीरेंद्र सेहवागने पोस्टमध्ये लिहिले, ‘तुम्ही केला तर चमत्कार, आम्ही केले तर खेळपट्टी बेकार आहे. कसोटी सामना १०७ षटकांत संपला. यावरून हेही सिद्ध होते की, खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत होत असेल तर आम्ही आमच्या क्षमतेने अधिक धोकादायक आहोत. बुमराह आणि सिराजने चमकदार कामगिरी केली आणि २०२४ ची सुरुवात चांगली होती.’ याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही खेळपट्टीबाबत वक्तव्य केले होते.

हेही वाचा – IND vs SA Test : विराट कोहलीने परदेशात केला खास पराक्रम! अजिंक्य रहाणेच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लहान सामना होता ज्यात भारतीय संघ विजयी ठरला. हा सामना अवघ्या १०७ षटकांत संपला. याचा अर्थ या सामन्यात केवळ ६४२ वैध चेंडू (नो आणि वाईड चेंडू वगळता) टाकण्यात आले. यापूर्वी १९३२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना १०९.२ षटकात संपला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. भारताने ३१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकला आहे. कारण १९९३ नंतर प्रथमच भारतीय संघाला येथे विजय मिळवता आला आहे. म्हणजेच येथील विजयाची तीन दशकांची प्रतीक्षा संपली आहे. भारतीय संघाने २ जानेवारी १९९३ रोजी येथे पहिली कसोटी खेळली आणि ती हरली होती.

हेही वाचा – IND vs SA : भारताच्या विजयानंतर ड्रेसिंग रूमपासून मैदानापर्यंतचे वातावरण कसे होते? ‘BCCI’ने शेअर केला VIDEO

सर्वात कमी वेळेत पूर्ण झालेले कसोटी सामना (चेंडूंनुसार)

६४२ – दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केपटाऊन, २०२४
६५६ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मेलबर्न, १९३२
६७२ – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, १९३५
७८८ – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर, १८८८
७९२ – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, १८८८ स्पर्धेत