Virat Kohli Involved In India Test Victory 15th Time in Overseas : केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय संघाने इतिहास रचला. या विजयासह त्यांनी दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. भारताने केपटाऊनमध्ये पहिल्यांदाच कसोटी जिंकली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई संघही ठरला. या विजयात अनुभवी फलंदाज विराट कोहलीने महत्त्वाचे योगदान दिले. त्याने पहिल्या डावात महत्त्वपूर्ण ४६ धावा केल्या. कोहलीच्या उपस्थित भारतीय संघाने १५व्यांदा विदेशातील मैदानावर कसोटी सामना जिंकला आहे.

विदेशात भारताच्या सर्वाधिक कसोटी विजयांचा एक भाग म्हणून कोहली संयुक्तपणे अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याने अजिंक्य रहाणेशी बरोबरी केली. रहाणेच्या उपस्थितीत टीम इंडियाने १५ वेळा परदेशात विजय मिळवला आहे. कोहली-रहाणेनंतर चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. या दोघांसह टीम इंडियाने परदेशात १४-१४ सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या कार्यकाळात प्रत्येकी १३ वेळा असे घडले.

Rajat Patidar's 4 Consecutive Sixes Video Viral
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Rajasthan Royals Vs Royal Challengers Bangalore Match Updates in marathi
RR vs RCB : विराट कोहलीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, आयपीएलमध्ये ‘हा’ विक्रम करणारा ठरला संयुक्त पहिला खेळाडू
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे

बुमराह-राहुल आणि जडेजासह ११वेळा विजयी –

जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा अकराव्यांदा परदेशात भारताच्या विजयात सहभागी झाले. तिघांनीही मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांची बरोबरी केली. राहुल आणि बुमराहसाठी ही मालिका संस्मरणीय ठरली. राहुलने दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावात ११३ धावा केल्या. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर राहिला. यामध्ये सेंच्युरियनमध्ये झळकावलेल्या संस्मरणीय शतकाचाही समावेश आहे. त्याचवेळी बुमराहने दोन सामन्यांत सर्वाधिक १२ विकेट्स घेतल्या. त्याला डीन एल्गरसह संयुक्तपणे ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणूनही गौरविण्यात आले.

हेही वाचा – IND vs SA : भारताच्या विजयानंतर ड्रेसिंग रूमपासून मैदानापर्यंतचे वातावरण कसे होते? ‘BCCI’ने शेअर केला VIDEO

कसोटी मालिकेत कोहली ठरला भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज –

विराट कोहलीबद्दल बोलायचे, झाले तर त्याने या मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. विराटने दोन सामन्यांच्या चार डावात १७२ धावा केल्या. या काळात त्याची सरासरी ४३.०० ची राहीली. केवळ दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गरने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या. त्याने चार डावात २०१ धावा केल्या. एल्गरची सरासरी ६७.०० राहीली.

हेही वाचा – AUS vs PAK 3rd Test : जमालने गोलंदाजी करताना लाबुशेनची अशी फिरकी घेतली की क्षणभर सर्वच झाले अवाक्, पाहा VIDEO

भारताने ७ गडी राखून मिळवला विजय –

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ५५ धावांवरच गारद झाला. त्यानंतर भारतीय १५३ धावांवर सर्वबाद झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचा पहिला डाव आटोपला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमानांनी दुसऱ्या डावात १७३ धावा केल्या. त्यामुळे भारताला ७९ धावांचे लक्ष्य मिळाले. जे भारताने तीन गडी गमावून गाठले.