क्क्रिकेटविश्वात मास्टर बास्टर अशी ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरने त्याचा माजी सहकारी वीरेंद्र सेहवाग याला बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे. सेहवागने या कारचे फोटो ट्विटरवर शेअर केले असून त्याने सचिनचे आभार मानले आहेत. सचिनने सेहवागला बीएमडब्ल्यू ७३० एलडी ही कार भेट दिली होती. भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत साधारण १.१४ कोटी इतकी आहे. साहजिकच इतकी मौल्यवान भेट मिळाल्यामुळे सेहवाग भारावून गेला. ‘थँक्यू सचिन पाजी, या भेटीसाठी खूप आभार’, असे ट्विट करून सेहवागने आपल्या भावना व्यक्त केल्या.

बीसीसीआयमध्ये कोणतीही ‘सेटिंग’ नव्हती म्हणून कोच झालो नाही-सेहवाग

सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी दीर्घकाळ भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले. या काळात त्यांनी बहुतांश वेळा सलामीवीराची भूमिका बजावली. २००३ हे वर्ष या जोडीने विशेष गाजवले. त्यामुळे साहजिकच दोघांमध्ये उत्तम बाँडिंग निर्माण झाले. सेहवागच्या निवृत्तीच्यावेळी सचिनने त्याचा उल्लेख ‘खरा चॅम्पियन’ असा केला होता. मैदानात त्याच्याबरोबर खेळताना नेहमीच आनंद मिळाला, असेही सचिनने म्हटले. त्यामुळे निवृत्तीनंतरही या दोघांची मैत्री टिकून राहिली. वीरेंद्र सेहवागनेही नेहमीच सचिनचे कौतूक करताना तो आपल्यासाठी प्रेरणा असल्याचे म्हटले होते. ‘काळही ज्याच्यासाठी थांबेल असा भारतातील एकमेव माणूस’, अशा शब्दांत त्याने सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

दरम्यान, सेहवागच्या तुलनेत सचिन तेंडुलकरला भारतीय संघातून सन्मानाने निरोप देण्यात आला. याउलट शिखर धवन आणि रोहित शर्मा या दोन सलामीवीरांनी आव्हान निर्माण केल्यामुळे सेहवाग शेवटपर्यंत संघातील स्थान कायम राखण्यासाठी झगडत होता. अखेर कामगिरीतील सातत्याअभावी त्याला नाईलाजानेच निवृत्ती पत्त्कारावी लागली.

विराट कोहली सचिनचा विक्रम मोडणार: सेहवाग